महाशिवरात्री निमित्ताने दुरटोली येथे शाहिरी पोवाड्याचे आयोजन
रोहा तालुक्यातील दुरटोली येथे स्वयंभू मंदीरांमध्ये दिनांक १ मार्च रोजी महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर सांस्कृतिक अशा शाहिरी पोवड्या चे आयोजन करण्यात आले आहे. पेण येथील नव्या दमाचे शाहिर वैभव घरत आपल्या शाहिरीच्या माध्यमातून छत्रपती शिवराय यांचा जीवनपट उलगडणार आहेत. त्यामुळे या देखण्या कार्यक्रमाचे वेध दूरटोली पंचक्रोशी व शिवभक्तांना लागले आहेत. 1 मार्च रोजी रात्री 9 ते 11 या दरम्यान कार्यक्रम होईल.
सदर कार्यक्रमाचे आयोजन दुरटोली पंचक्रोशी व येथील सामाजिक व राजकिय कार्यकर्ते, कमेटी उपाध्यक्ष दशरथ साळवी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे
दुरटोलीचे हे शंकर मंदीर स्वयंभू मंदीर आहे.सुतारवाडी विभागाचे, पंचक्रोशीचे श्रद्धा स्थान आहे. या मंदीराला खासदार सुनिल तटकरे साहेब यांनी भरघोस निधी प्राप्त करुन दिला आहे. मंदीर दिमाखात उभे झाले आहे. आपल्या गावचे मंदीर असल्याने आमदार अनिकेत तटकरे यांनी मंदीर उभारणीत जातीने लक्ष घालीत आहेत.मंदिराचा लोकार्पण सोहळा लवकरच होणार आहे. शिवरात्री निमित सर्व पंचक्रोशी कार्यक्रम पार पाडण्या करिता तन, मन, धनाने काम करित आहे.
सर्व धार्मिक कार्यक्रमांबरोबर आयोजित केलेल्या शाहिरी पोवड्याचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन पंचक्रोशी उत्सव कमेटी अध्यक्ष चिंतामणी दळवी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment