छत्रपती शिवाजी महाराज पंचक्रोशी कबड्डी स्पर्धेचा भैरवीनाथ क्रीडा मंडळ मालसई संघ ठरला अंतिम विजेता द्वितीय क्रमांक वांदोली, तृतीय क्रमांक यशवंतखार, चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला सोनगांव संघ रोहा-प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालसई ता.रोहा येथे दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यांचे उद्धघाटन रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष प्रितमताई पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पंचक्रोशी आयोजित कबड्डी स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला होता. अटीतटीच्या व लक्षवेधी झालेल्या लढतींमध्ये प्रथम क्रमांक भैरवीनाथ मालसई संघाने पटकावला.द्वितीय क्रमांकाचा मानकरी वांदोली संघ ठरला. तृतीय क्रमांकाचा मानकरी यशवंतखार संघ व चौथ्या क्रमांकाचा मानकरी सोनगाव संघ ठरला. सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान भैरवीनाथ मालसई संघाचा ऑलराऊंडर ओमकार तेलंगे याला मिळाला. उत्कृष्ट चढाई अजिंक्य कडव-वांदोली,उत्कृष्ट पक्कड रोशन चव्हाण- सोनगांव तर पब्लिक हिरो म्हणून कुमार धनावड
Posts
Showing posts from March, 2022
- Get link
- Other Apps
शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून पोलादपुर तालुक्यात होतेय उद्योगपतींकडुन प्लाॅट निर्मिती पोलादपुर -आमिर तारलेकर पोलादपुर तालुक्यामध्ये मोठ मोठ्या उद्योगपतींकडुन शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून छुप्या मार्गाने लाल मातीचे भराव व डोंगराचे उत्खनन करुन प्लाॅट तयार करीत असल्याचे दिसुन आले आहे. पोलादपुर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये तसेच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागुन मोठ मोठ्या उद्योगपतींनी स्थानिक दलालांना हाताशी धरुन गोरगरीब शेतकऱ्यांनाच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या असून त्या जमिनींवर स्थानिक दलालांना हाताशी धरुन भरावाची कामे करुन प्लाॅट तयार करीत असल्याचे पाहावयास मिळत आहेत. पोलादपुर तालुक्याच्या हद्दित मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असुन या चौपदरीकरणाच्या कामामुळे रस्त्याची उंची जमिनीपासुन ५ ते १० फुटापर्यंत वाढली असल्यामुळे या उद्योगपतींकडुन महामार्गाच्या बरोबरीने आपल्या जमिनींवर लाल मातीचे भराव करुन उंची वाढवत असल्याचे सर्रास प्रकार सुरु असल्याचे दिसुन आले आहे, तसेच तालुक्यातील डोंगरमाथ्यावर डोंगराचे उत्खनन करुन प्लाॅट करण्याचे
- Get link
- Other Apps
तिसे शाळेत विद्यार्थ्यांसाठी कोरोनो लसीकरण कार्यक्रम संपन्न रोहा-प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद शाळा तिसे येथे मंगळवार दि.२९/०३/२०२२ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी मार्फत १२ वर्षावरील विद्यार्थ्यांचे कोरोनो लसीकरण करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.श्री.वारे,डॉ. गायकवाड आरोग्य सेविका मखर मॕडम,आशासेविका सौ.कदम मँडम उपस्थित होत्या.त्यांनी योग्य प्रकारे १२ वर्षावरील विद्याथ्यांचे लसीकरण पूर्ण केले. कोरोनो लसीकरणासाठी शाळेत आल्याबद्दल व डॉ. वारे, डॉ. गायकवाड व मखर मँडम यांचा तिसे केंद्रीय शाळेकडून मुख्याध्यापक श्री.कापसेसर यांचेहस्ते त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार सत्कार करण्यात आला. आंबेवाडी सरकारी दवाखान्यातील डॉ. वारे निवृत्त. डॉ.वारे हे आपल्या वैद्यकीय सेवेतील ३७ वर्ष सफल सेवा पुर्ण करुन दि.३०/०३/२०२२ रोजी निवृत्त होत असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत ते सेवा देत होते.श्री.कापसेसर यांनी डॉ.वारे यांना पुढील आयुष्यासाठी सुख,शांती,उत्तम आरोग्य लाभो,अशा शुभेच्छा दिल्या. डॉ.वारे यांनी सत्काराला उत्तर देताना, आपण केलेल्या सेवेबद्दल सांगितले. डॉ.वार
- Get link
- Other Apps
सोनगांव येथे विवाह सोहळ्या निमित्त आमदार अनिकेतभाई तटकरेंची सदिच्छा भेट रोहा-शरद जाधव रोहा तालुक्यात सध्या विवाह सोहळ्यांचा हंगाम सुरू आहे. सोनगांव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरपंच तुकाराम खांडेकर यांच्या कनिष्ठ कन्येच्या शुभविवाह सोहळ्यास आमदार अनिकेत तटकरे यांनी आवर्जून हजेरी लावून चि.सौ.का. तृषाली व चि.विनायक या वधू- वरांस त्यांनी शुभाशिर्वाद दिले. यावेळी त्यांच्या समवेत अनंत देशमुख, राकेश शिंदे,जयवंतदादा मुंडे,रविना मालुसरे, हेमंत मालुसरे इ.कार्यकर्ते उपस्थित होते.तर ह्या विवाह सोहळ्यास विनोदभाऊ पाशिलकर,सुरेश मगर, रोहिदास पाशिलकर,आप्पा देशमुख,तानाजी देशमुख, खेळू ढमाळ, महेश तुपकर इ.राजकिय- सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळीनी उपस्थिती लावली. यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते चिंतामणी खांडेकर व सुशिल खांडेकर यांनी आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे खांडेकर परिवाराच्यावतीने स्वागत केले. अधिवेशन काळात कार्य व्यस्ततेमुळे अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहता न आल्याने आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी उपलब्ध वेळेत कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देऊन शुभेच्छा देत असल्याच
- Get link
- Other Apps
सानेगांव-यशवंतखार ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.स्वप्नाली संतोष भोईर आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित पालकमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरेंकडून कौतुक रोहा-प्रतिनिधी दैनिक नवराष्ट्र सरपंच सम्राट पुरस्कार २०२२ अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत सानेगाव ता.रोहा येथील सरपंच सौ.स्वप्नाली संतोष भोईर यांची आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.शनिवार दि.२६ मार्च २०२२ रोजी अलिबाग येथे PNP हाॕल मध्ये मान्यवरांच्या उपस्थिती त हा पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला.राज्याच्या मंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते व आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ.स्वप्नाली भोईर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी व्यासपिठावर सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम,जिल्हाधिकारी डाॕ.महेंद्र कल्याणकर,पोलिस अधिकारी अतुल झेंडे इ. मान्यवर उपस्थित होते.तर सरपंच सौ.स्वप्नाली भोईर यांचे समवेत उपसरपंच अपर्णा शामित दिवकर,युवा नेतृत्व संतोष भोईर,पांडूरंग भोईर,विठोबा गुंड,निलेश सुरणकर,सचिन जांभळे,संचिता जांभळे इ.ग्रामस्थ उपस्थित होते. आपल्या कार्यकाळात सरपंच सौ.स्वप्नाली संतोष भोईर य
- Get link
- Other Apps
तिसे केंद्रस्तरिय शाळापूर्वतयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न रोहा-प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या शाळापूर्वतयारी केंद्रस्तरिय मेळावा केंद्रप्रमुख श्रीम.चंद्रलेखा म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली व तिसे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शैलेश लांबे,तिसे शाळा मुख्याध्यापक श्री.सहदेव कापसे सर,वरसगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री. नथुराम ठाकूर सर,हेटवणे शाळेचे मुख्याध्यापक श्री.सचिन मुसळे सर,तज्ञ मार्गदर्शक व उपक्रम शिल आदर्श शिक्षिका श्रीम.श्रद्धा बिरगावले मँडम,श्रीम.सोनल पाटील मँडम व तिसे केंद्रातील सर्व शिक्षक,पालक,ग्रामस्थ व दाखलपात्र विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात तिसे शाळेत संपन्न झाला. प्रथम सत्रात तज्ञ मार्गदर्शक श्रीम.श्रद्धा बिरगावले रा.जि.प.शाळा तिसे यांनी शाळा पूर्वतयारी प्रशिक्षणाची संपूर्ण रुपरेषा सांगून उद्दिष्ट सांगितली ,कोरोना काळात विद्यार्थ्यांचा मागिल तिन वर्षाचा झालेला लर्निंग लाँस भरून काढणे,इ.१ लीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी करणे,शिकविण्यासाठी प्रेरित करण्यासाठी स्वतः साक्षर असलेच पाहिजे हे पालकांना पटवून देणे. श्रीम.सोनल पाटील यांनी स
- Get link
- Other Apps
चोचिंदे गवळवाडी येथे सामाजिक सभागृहसाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर महाड-प्रतिनिधी रायगडचे लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यमंत्री तथा पालकमंत्री नामदार आदितीताई तटकरे, विधान परिषद आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी चोचिंदे गवळवाडीला विकास कामांमध्ये नेहमी झुकते माप दिले. वाडीवर असणाऱ्या विविध समस्या दूर करून विकास होताना दिसत आहे. आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या स्थानिक आमदार विकास कामांतर्गत आमदार निधीतून चोचिंदे गवळवाडी येथील सामाजिक सभागृहासाठी रुपये १० लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. :
- Get link
- Other Apps
बारसोली कातकरीवाडीमधे जातीच्या दाखल्याकरिता आयोजित शिबिराला भरघोस प्रतिसाद धाटाव-शशिकांत मोरे रोहा तालुक्यातील धाटाव, बारसोली कातकरी वाडी येथे कातकरी समाजातील बांधवांचे जातीचे दाखले काढण्यासाठी शिबिरचे आयोजन करण्यात आले होते.या आयोजित शिबिराला १५५ जणांनी अर्ज भरून आपला प्रतिसाद दर्शविला. रोह्याचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने,तहसीलदार कविता जाधव,निवासी तहसीलदार राजेश थोरे आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली २५ मार्च रोजी कातकरी समाजातील बांधवांचे जातीचे दाखले काढण्यासाठी धाटाव येथील बारसोली कातकरीवाडी येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराला लोणेरे कॉलेजचे प्राचार्य मढवी, पेण येथील आदिवासी विकास निरक्षक मोरे,सानेगाव आश्रम शाळा शिक्षक नागोठकर, धाटावचे उपसरपंच अशोक मोरे,ग्रामविकास अधिकारी श्री दिपक चिपळूणकर,धाटावचे तलाठी भास्कर तुंबरे यांसह अंगणवाडी सेविका व वाडीवरील सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. याकामी गावातील प्रतिश्ठीत युवा नेते रोहिदास पशिलकर यांनी मोलाचे सहकार्य केले.सकाळ पासूनच या शिबिराला सुरुवात झाल्याचे पहावयास
- Get link
- Other Apps
बारसोलीमध्ये श्री बापुजीदेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहण सोहळा मान्यवरांच्या स्वागतासाठी बारसोली नगरी सज्ज खा.सुनील तटकरे, ना.अदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती धाटाव-शशिकांत मोरे रोहा तालूक्यातील श्री बापुजीदेव मंदीराची नव्याने उभारणी केली असल्यामुळे या मंदिराचा प्राणप्रतिष्ठापणा व क लशारोहण सोहळा मोठ्या आनंदमय वातावरणात असंख्य भाविकांच्या साक्षीने मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे.या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असुन सबंध परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.या सोहळ्याला अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने सर्वांच्या स्वागतासाठी बारसोली नगरी सज्ज झाल्याचे पहावयास मिळत आहे. या सोहळ्याला रायगडचे खा.सुनील तटकरे,पालकमंत्री ना.अदिती तटकरे,आ.अनिकेत तटकरे,सुदर्शन केमिकलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशभाऊ राठी,जि.प माजी शिक्षण समिती सभापती भाईसाहेब पाशिलकर,सुदर्शन केमिकलचे व्हाइस प्रेसिडेंट विवेक गर्ग,विजयराव मोरे,मधुकर पाटील,माजी उपसभाती विजयाताई पाशीलकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, रोहिदास पाशिलकर,जयवंत मुंढे यांसह
- Get link
- Other Apps
कोलाड येथील युवकाचा दुचाकीवरुन पडून मृत्यू होळी सणात दुर्देवी घटना रोहा-शरद जाधव सण उत्सव हे कुटुंबाला आनंद देऊन जातात पण याच सण उत्सवात एखाद्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला तर क्षणात, होत्याचे नव्हते होईल ही कल्पनाच मनाला न पटणारी आहे. कोलाड (महादेववाडी) येथील 42 वर्षीय तरुणाचा दुचाकी वरुन प्रवास करित असताना गतिरोधकवरुन पडून मृत्यू झाला. होळीच्या सणात अतिशय दुर्देवी घटना घडली असुन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कोलाड गावठण (महादेववाडी) येथील राजेश परशुराम चितळकर वय 42 हा तरुण तळोजा येथे नोकरीस होता. त्या परिसरात रात्री च्या वेळी हळदी कार्यक्रमावरुन येत असताना दुचाकी गतीरोधकाला धडककल्याने युवकाचा मृत्यू झाला.सदर घटनेची खबर गावी समजताच ऐन सणात कुटुंबावर व गावावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. राजेश चितळकर हा तरुण विवाहित होता. पत्नी, एक मुलगा, मुलगी ,आई असा परिवार आहे, मित्र मंडळी मध्ये वावरणारा होता. गावच्या सामाजिक कार्यात तो हिरेरिने सहभाग घेत होता. मनमिळाऊ स्वभाव होता. सदरची घटना अतिशय दुखद असुन ऐन तारुण्यात घरातील कर्तबगार कमवत्या व
- Get link
- Other Apps
मालसई येथे क्रिकेट सामन्यांचे उद्धघाटन उत्साहात संपन्न रोहा-प्रतिनिधी ग्रामीण भागातील क्रिकेटला चालना मिळावी या उद्देशाने भैरवीनाथ क्रिडा मंडळ मालसई ता.रोहे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यांचे उद्धघाटन करून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. रोहे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा प्रितम पाटील, कुणबी युवक मंडळ तालुकाध्यक्ष अनंत थिटे,माजी अध्यक्ष महेश बामुगडे, युवा कार्यकर्ते निशिकांत पाटील,महेश तुपकर, हेमंत मालुसरे,ग्रा. पं.सदस्य अनिल आयरे,निलेश मालुसरे,सदाशिव मालुसरे,नरेश मालुसरे, येणाजी शिंदे,माजी सरपंच नथुराम मालुसरे,उपसरपंच सुनिल मोहिते,प्रकाश मराठे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. श्री शिवछत्रपती असोसिएशन पंचक्रोशी यांच्या मान्यतेने व भैरवीनाथक्रिडा मालसई क्रीडा मंडळ मालसई यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यात उद्धघाटनीय सामना भैरवीनाथ मालसई विरूद्ध जय भवानी मुठवली या दोन संघामध्ये झाला.तर स्पर्धेत विभागातील एकूण १६ संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून स्पर्धेतील रंगत वाढविली.
- Get link
- Other Apps
मुलुंड राघवेंद्र स्वामी गार्डन मध्ये होळी उत्सवानिमित्ताने रंगांची उधळण अबालवृध्द गेले रंगात न्हाऊन मुंबई / मुलुंड (प)-प्रतिनिधी मुलुंड पश्चिम येथील राघवेंद्र स्वामी गार्डन मध्ये गार्डनचे कमिटी अध्यक्ष श्री.जयवंत केणी आणि श्री.गुरुराज भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रंगांच्या उधळणीत अबालवृध्द न्हाऊन गेले होते. सदर कार्यक्रमासाठी महिला कार्यकर्त्या सौ. पुष्पा सावळा, सौ. हेमांगी ठाकुर, सौ. आसमा शेख, सौ. भारती साठे, सौ. ज्योती, सौ. प्रिया गुप्ता, सौ. मेघा साबळे आणि सौ.रिना रविकांत पोटफोडे यांची मोलाची साथ लाभली. कोरोना नंतर थांबलेले जनजीवन पुन्हा पुर्वपदावर येत आहे.दोन वर्षांच्या प्रदिर्घ विश्रांती नंतर नागरिक होळी सणाचा आनंद लुटताना दिसत आहेत.कोरोनाने जगण्याची किंमत काय असते?हे शिकविले आहे. त्यामुळे जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातुन पाहून आनंद निर्माण करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करीत आहे.आपल्या पारंपारिक सणांमधून आपुलकीचा नवा संदर्भ शोधुन केलेला जल्लोष, उर्जा निर्माण करणारा ठरत आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👇👇👇
- Get link
- Other Apps
"पंढरपुर,आळंदी प्रमाणे किल्ला गाव तिर्थक्षेत्र कसे होईल, याकरिता निश्चित प्रयत्नशील राहू"- खासदार सुनिल तटकरे रोहा-शरद जाधव आध्यात्मिक विचारसरणीचा पाया किल्ला या गावाने रचला आहे.धाटाव पंचक्रोशीचा आध्यात्मिक इतिहास सर्वत्र ज्ञात आहे. मंदिराच्या सभोवताली निसर्गरम्य भुमी दिसत आहे. अनेक वर्षांचे हे मंदीर आणि या मंदिराची रचना पाहता जणू काही हे शिवकालीन मंदीरा प्रमाणे असुन भविष्यात पंढरपुर, आळंदी तिर्थक्षेत्रा प्रमाणे किल्ला हे गाव, श्री वाकेश्वर तिर्थक्षेत्र कसे होईल या करिता प्रयत्नशील राहू असे अभिवचन खासदार सुनिल तटकरे यानी दिले. आमदार अनिकेत तटकरे यांच्या स्थनिक विकास निधीतून निर्माण होत असलेल्या वाकेश्वर सामजिक सभागृहाच्या भुमीपुजना प्रसंगी ते बोलत होते. व्यासपिठावर आमदार अनिकेत तटकरे,तालुकाध्यक्ष विनोदभाऊ पाशिलकर, शंकरराव भगत,राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, रोहिदास पाशिलकर,अनिल भगत,योगेश बामुगडे, सरपंच नरेश पाटील,अमित मोहिते, ज्ञानेश्वर साळुंखे,प्रदीप बामुगडे ,विष्णू लोखंडे,सरपंच रुपेश बामुगडे, जयवंत मुंढे.केशव भोकटे,अरविंद मगर विभागातील सरपंच उप
- Get link
- Other Apps
राणेचीवाडी येथे मुलांनी उभारले शेतकरी वडिलांचे स्मारक समाजापुढे ठेवला नवा आदर्श तळा-किशोर पितळे तळा तालुक्यातील नगरपंचायत हद्दीतील राणेचीवाडी येथील जगदीश, जयेश,भास्कर, गोळे यांनी वडीलांचे स्मारक उभारून जन्म दात्या आ वडीलांच्या स्मृती चिरतरुण (जागृत) रहाव्यात या उद्देशाने पंचमुखी मारूती मंदिरा शेजारी काल स्मृति दिनी उभारले. यापूर्वी गेल्या वर्षी शेतकरी आदिवासी बांधवांना फावडे पिकाव,घमेले झाडू असे साहित्य वाटप करून वर्ष स्मृती दिन साजरा केला होता.मात्र यावेळी स्मारक उभारले.आजच्या काळातआई वडिलां प्रती असणारीआस्था,प्रेम,आत्मियता बदलत्या काळानुसार लोप पावत चालली आहे पैसा म्हणजे सर्वस्व समजणारे बिलंदर असतात. पण या मुलांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे. याचे सर्वत्र केले जात आहे.कै.नारायण गोळे हे दानशूर,प्रचंड कष्टाळू व हाडाचे शेतकरी म्हणून परिचित होते.हलाकीचे दिवस असताना देखील अनेक संकटांना तोंड देऊन त्यांनी शेती हा पारंपरिक व्यवसाय जोपासलाआजच्या काळात माणूस आपली एक इंच जागा देखील सोडत नाही मात्र नारायण गोळे यांनी गावातील पंचमुखी मंदिरासाठी स्वतःची चार गुंठे जागा गावासाठी दान स्वरूपात दिली.त
- Get link
- Other Apps
"टिका करणे हे विरोधकांचे काम असले तरी, लोकांची सेवा करणे हा माझा धर्म आहे" - खासदार सुनिल तटकरे म्हसळा -श्रीकांत बिरवाडकर म्हसळा श्रीवर्धन तालुक्यातील जनतेने सन 2019 पासुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शक्ती उभी केली म्हणूनच तुमचा हक्काचा आमदार, मंत्री आणि खासदार होण्याची संधी मिळाली. लोकांच्या हिताची प्रभावीपणे काम करण्याची बांधिलकी घेत पुढील कालावधीत आपल्याला काम करायचे आहे ,असे मनोगत आणि होळी उत्सवाच्या शुभेच्छा देताना खासदार सुनिल तटकरे यांनी मेंदडीकोंड येथे 10 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सभामंडप व रंगमंच बांधकामाचे उद्धघाटन करताना व्यक्त केले. सार्वजनिक काम करत असताना आपल्यावर टिकाटिप्पणी होत असते, टिका करणे हे विरोधकांचे काम असले तरी ,लोकांची सेवा करणे हा माझा धर्म असल्याचे खासदार तटकरे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. पुढे बोलताना गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एखाद्या पक्षाकडून काम होत असेल तर गावातील ग्रामस्थांनी सामुदायिक एकता दाखवली पाहिजे. तशी ती मेंदडी गावात दिसत नसल्याने खासदार तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ह
- Get link
- Other Apps
श्रीमती पार्वतीबाई ( सुंदराबाई ) बाळाराम कदम यांचे निधन कोलाड -श्याम लोखंडे रोहा तालुक्यातील धामणसई पंचक्रोशीतील गावठण येथील श्रीमती पार्वतीबाई (सुंदराबाई ) बाळाराम कदम यांचे वयाच्या 92 वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने कदम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळृला असून परिसरात शोककळा पसरली आहे . पार्वतीबाई परिसरात सुपरिचित होत्या. आपल्या पतीसमवेत पराकष्टा करत संसाराचा गाडा चालवत. पारंपरिक पद्धतीचा शेती व्यवसाय व त्याला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन म्हणजे गाई म्हशींचा सांभाळ करत दुग्धव्यवसायच्या जोरावर कुटूंबाचे सांभाळ केले. धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्राची मोठी आवड. तसेच वारकरी संप्रदायाचा कुटूंबात वारसा जोपासत सामाजिक कार्यात अग्रेसर राहत महिलांच्या सर्व विविध कार्यक्रमात नेहमी सक्रिय सहभाग घेणाऱ्या मोठ्या कदम परिवारातील सुंदराबाई यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कै.पार्वतीबाई कदम यांच्या पश्चात पाच मुले आणि दोन मुली,पुतणे,सुना, जावई, नातवंडे,पतवंडे, तसेच नात जावई,असा मोठा परिवार आहे.त्यांचे दशक्रिया विधी बुधवार दिनांक 23 मार्च व उत्तरकार्य तेरावे शनिवार दिन
- Get link
- Other Apps
"शैक्षणिक विकासासाठी शाळा व्यवस्थापन समित्या सक्षम होणे काळाची गरज"-सौ.रश्मी साळी रा.जि.प.शाळा धामणसई येथे केंद्रस्तर शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण संपन्न रोहा-प्रतिनिधी जिल्हा परिषद शाळा धामणसई तालुका रोहा येथे दिनांक 14 मार्च 2022 व दिनांक 15 मार्च 2022 रोजी शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण केंद्र स्तर प्रशिक्षण संपन्न झाले.पिंगळसई केंद्राच्या केंद्रप्रमुख रश्मी साळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या प्रशिक्षणात त्यांनी उपरोक्त विधान केले. धामणसई शाळेच्या सहशिक्षिका सौ. साधना आंबेकर यांनी उपस्थितांचे सहर्ष स्वागत केले. केंद्रप्रमुख सौ. रश्मी साळी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन संपन्न झाले. सर्व उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षणार्थींना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर दयाराम भोईर,उस्मिता आयरे,रविंद्र ठाकूर,दिनेश रटाटे इ.ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे विश्वनाथ थिटे,विष्णू भोईर,रुपाली चाळके,प्रविण भोईर व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत
- Get link
- Other Apps
कशेडी येथे भीषण अपघात एक मृत्युमुखी तर एकजण जखमी पोलादपुर -प्रतिनिधी पोलादपुर तालुक्यातील कशेडी येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या प्रवाशांना मुंबई कडुन रत्नागिरी च्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या टेम्पोने उडवून भीषण अपघात होऊन १ मृत्युमुखी तर १ जखमी झाला आहे. मुंबई कडुन रत्नागिरी च्या दिशेने जाणाऱ्या एम एच ४८ बीटी १८१७ ह्या गाडीतील प्रवासी सकाळी ३.३० वाजता च्या सुमारास कशेडी येथे चहा पिण्यासाठी थांबले असता, मुंबई कडुन रत्नागिरी कडे निघालेल्या एम एच ८ ऐ पी ९२११ ह्या टेम्पोने भरधाव वेगात येऊन महामार्गाशेजारील टपरीवर चहा पित असलेले विनीत राऊल, अशोक पानगले, जयेश राऊत यांना उडवल्याने विनीत राऊल हे जागीच मृत्युमुखी पडले तर अशोक पानगले हे गंभीर जखमी झाले असुन पोलादपुर ग्रामीण रुग्णालयात प्राथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सर जे जे रुग्णालय मुंबई येथे हलविण्यात आले आहे, जयेश राऊत किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर पोलादपुर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेतील टेम्पो चालकावर पोलादपुर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पोलीस हवलदार दिलीप सरांगे करीत आहेत.