तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी सौ. मानसी लोखंडे यांची नियुक्ती कोलाड -श्याम लोखंडे रोहा तालुक्यातील मौजे तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी विद्यमान उपसरपंच सौ.मानसी मंगेश लोखंडे यांची 31 मे रोजी शासकीय नियमानुसार नियुक्ती करण्यात आली त्यानुसार त्यांनी पदभार स्विकारला . सदर या ग्राम पंचायत येथील थेट सरपंच सौ. रुपाली रघुनाथ कोस्तेकर यांनी ग्राम पंचायत मध्ये केलेल्या अपहार व गैर व्यवहार प्रकरणी येथील सदस्यांनी त्यांच्या विरोधात तक्रारी अर्ज दाखल केले गेले होते त्या चौकशी आवहालात चौकशीत कोकण विभागीय आयुक्त यांच्या सुनावणीत सौ.रुपाली कोस्तेकर यांचे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 चा मुंबई अधिनियम क्रमांक 3 ) कलम 39 (1)नुसार सरपंचपद व सदस्यपद रद्द करण्यात आल्याने त्या जागेवर महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत अधिनियम अंतर्गत विद्यमान उपसरपंच सौ. मानसी लोखंडे यांनी प्रभारी सरपंचपद स्वीकारले आहे . यावेळी ग्राम विकास अधिकारी सौ. पिंपळकर,ग्राम पंचायत सदस्य सौ.रिया लोखंडे,सरोजनी मरवडे,रणिता मरवडे ,दशरथ जाधव ,ग्राम पंचायत कर्मचारी सुभाष बामणे,माजी सर
Posts
Showing posts from May, 2022
- Get link
- Other Apps
तळ्यातील पत्रकाराने तयार केली भन्नाट इलेक्ट्रिक कार फक्त 30 रूपयांत धावते तब्बल 80 किमी अंतर तळा - संजय रिकामे सध्या जगभरात पर्यावरणासाठी घातक ठरणारं वायू प्रदूषण टाळण्यासाठी पेट्रोल-डिझेलवर धावणाऱ्या वाहनांपेक्षा विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन दिलं जात आहे. आपल्या देशातही अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी सरकारतर्फे अनेक योजना राबवल्या जात असून, अनेक वाहन उत्पादक कंपन्याही इलेक्ट्रिक कार्सची निर्मिती करत आहेत. त्यांच्या किमती कमी करता याव्यात, त्यांचा वापर अधिकाधिक सहज व्हावा यासाठी संशोधन सुरू असून, सरकारी पातळीवर, तसंच वाहन कंपन्यांच्या स्तरावर देखील विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण वाहननिर्मितीसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. यासाठी अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जातं. या पार्श्वभूमीवर सध्या चर्चा आहे ती रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील एका पत्रकाराने तयार केलेल्या अनोख्या इलेक्ट्रिक कारची. तळा शहरात पुसाटी इथला रहिवाशी असलेला आणि सध्या केबल ऑपरेटर आणि पत्रकार असलेल्या विराज वसंत टिळक याने अवघ्या 30 रुपयांमध्ये 80 किलोमीटर्स धावणारी इलेक्ट्रिक कार बनवल
- Get link
- Other Apps
पिंगळसई ता.रोहा येथील प्रेमळ स्वभावाच्या सौ.कमल नारायण देशमुख यांचे दुःखद निधन सामाजिक कार्यकर्ते जगदीश देशमुख यांना मातृशोक रोहा-प्रतिनिधी आपल्या प्रेमळ स्वभावाने परिसरात सुपरिचित असलेल्या सौ.कमल नारायण देशमुख यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले.गुरुवार दिनांक १९ मे २०२२ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या अंतयात्रेसमयी राजकीय,सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच समाजातील विविध स्तरावरील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांचा दशक्रिया विधी शनिवार दिनांक २८ मे २०२२ रोजी सकाळी ठिक ८ वा.३० मिनिटांनी जानकी घाट,जोगेश्वरी मंदिर पिंगळसई ता.रोहा येथे होईल.तर उत्तरकार्य मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी पिंगळसई निवासस्थानी होणार आहेत. सौ.कमल नारायण देशमुख यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात मोठा परिवार असून त्यांचे सुपूत्र सामाजिक कार्यकर्ते श्री.जगदीश देशमुख व कुटूंबियांची अनेक मान्यवरांनी भेट घेऊन सांत्वन केले आहे.
- Get link
- Other Apps
शेनाटे प्रकरणात नवा पेच, अजून दोन आरोपी वाढण्याची शक्यता. तळा -संजय रिकामे तळा येथील शेनाटे गावाजवळ दिनांक 23 मे 2022 रोजी दुपारी साधारण 12.00 वाजण्याच्या सुमारास दिनेश बटावले यांना रिक्षा घेऊन जाताना जबर मारहाण करण्यात आली होती. ते गंभीर जखमी असल्याने त्यांना मुंबई येथे तातडीने हलवण्यात आले होते. मारहाणीमुळे त्यांची तब्येत जास्त खालवल्याने त्यांची मृत्युशी चाललेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा मुंबईत मृत्यू झाला. यातील एक बाब महत्वाची आहे, ती म्हणजे त्यांचा मृत्यू पूर्वीचा मुंबईतील जबाब, त्या जबाबात माझ्यावर चार जणांनी हल्ला केला होता. मी शेनाटे ते तळा असा प्रवास करत असताना चौघानीं म्हणजे गणेश बटावले, भास्कर कारे, रुपेश बटावले आणि राकेश बटावले यांनी माझ्यावर हल्ला केला आणि मला स्मशानाजवळ नेऊन बरीच मारहाण केली. त्यांच्या जवळ असलेल्या लोखंडी रॉड, लाकूड, दगडाने माझ्या डोक्यात, छातीवर, पायावर दुखापत केली. अजून बरीचशी सविस्तर माहिती मारणापूर्वीच्या जवाबत दिनेशने नोंदवली आहे. मात्र प्रत्येक्ष दर्शिने आपल्या जवाबत फक्त दोघांची म्हणजे रुपेश बटावले आणि गणेश बटावले यांचीच नाव तळा पोलीस ठाण्यात जव
- Get link
- Other Apps
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत कल, अभियोग्यता चाचणी आयोजित करणे हा स्तुत्य आणि स्वागतार्ह उपक्रम- पालकमंत्री आदिती तटकरे कोलाड येथे करिअर मार्गदर्शन शिबिरासाठी विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद रोहा- प्रतिनिधी विशेषतः शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी सुमारे तीन हजार रुपये खर्च करून घेतली जाणारी, कल-अभियोग्यता चाचणी आज रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध केली जात आहे, हा आयोजकांनी घेतलेला स्तुत्य आणि स्वागतार्ह उपक्रम असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले. त्या कोलाड तालुका रोहा येथे सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या द.ग.तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित विद्यार्थी कलचाचणी व करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्धघाटन करताना बोलत होत्या .आपण स्वतः व आमदार अनिकेतभाई तटकरे शिक्षण घेत असताना आपल्याला अशा प्रकारच्या उपक्रमांचा लाभ घेता आला नाही. मात्र आत्ताची पिढी खूप भाग्यवान आहे. आपण कोणते शिक्षण घ्यावे व कोणत्या क्षेत्रात करिअर करावे यासाठी मार्गदर्शन उपलब्ध होत आहे.रायगड जिल्ह्यात सात ठिकाणी हा उपक्रम कार्यान्वित ह
- Get link
- Other Apps
शेणाटे ता.तळा येथे मागील भांडणाच्या रागातून रिक्षा चालकास जबर मारहाण जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू तळा -संजय रिकामे शेणाटे येथे मागील भांडणाच्या रागातून एका रिक्षा चालकास जबर मारहाण करण्यात आली असून जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना तळा तालुक्यात घडली आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार शेणाटे येथील दिनेश बटावले हे रिक्षातून तळा येथे येत असताना मौजे खांबवली गावच्या स्मशानभूमीजवळ आरोपी रुपेश बटावले व गणेश बटावले हे अचानक रिक्षाच्या समोर येऊन त्यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करीत दिनेश बटावले हे बसलेल्या रिक्षाची समोरील काच दगड मारून फोडली.तसेच रिक्षा चालक बाहेर पडल्यानंतर दोन्ही आरोपींनी दिनेश बटावले यांना बाहेर काढून हाता बुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी दिनेश बटावले यांना जवळच असलेल्या स्मशानभूमीजवळ ढकलत घेऊन जात त्यांना खाली पाडले व दोन्ही आरोपींनी मोठमोठ्या दगडांनी त्यांच्या उजव्या पायावर मारून पाय मोडला शिवाय डोक्याला देखील गंभीर दुखापत करून दमदाटी केली व तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच तळा पोलीस ठाण्याचे प
- Get link
- Other Apps
तळा परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न तळा -संजय रिकामे मागील सरकारच्या काळात विकास खुंटला होता. राज्य शासनाकडून शहर आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी मदत मिळाली नव्हती. परंतु राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी तळा शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणण्यास सुरुवात केली असताना ग्रामीण भागात देखील विकासकामे जोमाने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कासेवाडी येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे आणि कासेवाडी येथील अंतर्गत रस्त्याचे उद्धघाटन त्याचप्रमाणे शेणाटे येथील अंगणवाडीचे उद्धघाटन पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते पार पडले. विकासकामांच्या उद्धघाटना निमित्ताने ग्रामस्थांनी केलेल्या मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन ना.अदिती तटकरे यांनी यावेळी दिले.आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की तटकरे साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यापासून या तालुक्याला झुकते माप दिले.श्रीवर्धन मतदार संघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली यात तळा तालुक्याचा खूप मोठा वाटा आहे.म्हणूनच
- Get link
- Other Apps
भानंग ग्रामपंचायतीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा ग्रामसभेचा ठराव मंजूर तळा-संजय रिकामे १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून झालेल्या ग्रामसभेत भानंग ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा ग्रामसभेचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.१९ मे रोजी झालेल्या या सभेसाठी भानंग ग्रामपंचायतीचे सरपंच रघुनाथ वाघरे,उपसरपंच सौ.सुहानी भौड, सदस्य नाना दळवी, लक्ष्मण काते,सौ.सुलोचना रेवाळे,सुप्रिया पागार,कृषी मंडळ अधिकारी सागर वाडकर,कृषी पर्यवेक्षक प्रताप कदम,वरिष्ठ लिपिक दिलीप पाटील, ग्रामसेवक खंडू काळे, पत्रकार संजय रिकामे,जिल्हा शांतता कमेटी सदस्य दामोदर काते पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विनापरवानगी बांधण्यात येणाऱ्या अनधिकृत बांधकामांमुळे गावातील नागरिकांना अडचणी निर्माण होऊन गावाला बकाल स्वरुप प्राप्त होते हे लक्षात घेऊन भानंग ग्रामपंचायतीने १९ मे रोजी घेतलेल्या ग्रामसभेत स्वार्थी वृत्तीने अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला.या पूर्वी अनधिकृत केलेल्या बांधकामांवर कारवाई करण्य
- Get link
- Other Apps
महुरे गाव मूलभूत सोई सुविधांपासून कधीही वंचित राहणार नाही- आ.अनिकेत तटकरे तळा- संजय रिकामे सामाजिक विकास योजनेंतर्गत महुरे येथील रस्त्याच्या कामाचे उद्धघाटन व जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आ.अनिकेत तटकरे यांच्या शुभ हस्ते महूरे येथे पार पडले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी ग्रामस्थांना मूलभूत सोई सुविधांपासून कधीही वंचित ठेवणार नाही असे आश्वासन यावेळी दिले. या उद्धघाटन व भूमिपूजन सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नाना भौड, माजी बालकल्याण सभापती गीता जाधव,माजी पं.स. सभापती अक्षरा कदम,माजी सरपंच विठोबा साबळे, मागासवर्गीय सेल रायगड जिल्हा अध्यक्ष उत्तम जाधव,कैलास पायगुडे महुरे ग्रामस्थ महिला मंडळ मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ.अनिकेत तटकरे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की,महुरे नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहीला आहे. तळा तालुक्याची निर्मिती होण्याआधी खासदार तटकरे साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यापासूनच या गावातील विकास कामे मार्गी लागत आली आहेत. महुरे येथील नागरिकांनी सुध्दा नेहमीच खा. तटकरे साहेब, पालकमंत्री ना.अदित
- Get link
- Other Apps
डॉ.अपुर्व भट यांनी दिले रुग्णांना जीवनदान आधुनिक तंत्रज्ञान वापरून यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव रोहा-प्रतिनिधी रोहे शहरात वैद्यकीय सेवेत नव्यानेच दाखल झालेले ,रोहे शहरातील जुने जाणते व निष्णात स्त्री रोग तज्ञ डॉ .रघुनाथ भट यांचे सुपुत्र डॉ .अपुर्व भट यांनी नुकतेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णांना जीवनदान दिले . काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी रक्ताच्या उलट्या होत असलेला पेशंट त्यांच्याकडे आणण्यात आला त्याचे पल्स देखील व्यवस्थित लागत नव्हते ,पोटात व अन्ननलिकेत रक्ताचे थारोळे झाले होते डॉ .अपुर्व यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांची एन्डोस्कोपि केली व दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून रक्तस्त्राव थांबवला व त्यांना पुढील ट्रीटमेंट दिली व स्ट्रेचर वर आलेला रुग्ण चालत घरी गेला. अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया नवी मुंबई येथे होतात ,डॉ.अपुर्व भट यांनी त्या शस्त्रक्रिया रोह्यात यशस्वीपणे केल्या. डॉ .अपुर्व भट हे एम .एस .जनरल सर्जन असून आधुनिक पद्धतीने दुर्बिणीद्वारे कॅन्सर शस्त्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण त्यांन
- Get link
- Other Apps
घोसाळे मध्ये रंगला बैलगाडी शर्यतींचा थरार शर्यतींना उत्स्फूर्त प्रतिसाद बैलगाडी शर्यत रसिकांची अलोट गर्दी रोहा-प्रतिनिधी गेले अनेक वर्षे बैलगाडी शर्यतीं वर असलेली बंदी शासनाने उठवली, त्यामुळे बैलगाडी शर्यत शौकिनांच्या आनंदाला पारावार उरला नाही. जिथे शर्यती असतील तिथे आपली राजा-सर्जाची बैलजोडी घेऊन शर्यत प्रेमी उपस्थिती लावू लागले आहेत. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, किल्ले घोसाळगडाच्या परिसरात आपल्या पुरातन परंपरांचा ठेवा जतन करण्याचा प्रयत्न नेहमीच होताना दिसत आहे. आधुनिकतेच्या जमान्यात सुद्धा खिल्लार बैलांची जोपासना करून आपल्या मातीतला रांगडा खेळ जोपासण्याचे काम अत्यंत आनंदाने परिसरातील ग्रामस्थ करताना दिसत आहेत. शेतीच्या कामांतून थोडी उसंत मिळाल्यावर मनोरंजन-विरंगुळा म्हणून, आपल्या ग्रामदेवतांच्या उत्सवांमध्ये बैलगाडी शर्यतीचे आयोजन करणे हा आपल्या परंपरेचा एक भाग आहे. मोबाईल गेमच्या व्हर्च्युअल विश्वात अडकलेल्या आजच्या तरुणाईला हा जीवंत थरार अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिली ती रोहा तालुक्यातील घोसाळे गावाने. घोसाळे गावचे ग्रामदैवत श्री कालभैरवाच्या वार्षिक उत्सवान
- Get link
- Other Apps
" मी जो घडलो,तो कै.अशोकशेठ लोखंडे यांच्यामुळेच"- खासदार सुनिल तटकरे तळा-किशोर पितळे "मी जो घडलो, तो कै.अशोकशेठ लोखंडे यांच्यामुळे" असे सांगत खासदार सुनिल तटकरे यांनी कै.अशोकशेठ लोखंडे यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. कै.अशोकशेठ लोखंडे यांचा चौतिसावा स्मृतिदिन समारंभ रविवार दिनांक ८ मे २०२२ रोजी अशोक ल.लोखंडे विद्यामंदिर पिटसई येथे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे रायगड रत्नागिरीचे खासदार सुनिल तटकरे यांनी कै.अशोकशेठ लोखंडे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. या स्मृतिदिन समारंभात तटकरे म्हणाले की, कै.अशोकशेठ लोखंडे यांचे योगदान माझ्या आयुष्यात खूप मोठे आहे.त्यांच्या विषयी भावना शब्दात व्यक्त करता येणार नाही.आज मी जो उभा आहे तो अशोकशेठ लोखंडे यांच्यामुळेच.अशोक ल. लोखंडे विद्यामंदिर या शाळेने कुठलीही अपेक्षा न करता केवळ विद्यार्थी घडवण्याचे काम केले विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक उपजत असलेले गुण याच्यामध्ये बदल न करता त्या विकसित करून विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचे काम ही शाळा करत आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण देशात तळा तालुक्याचे
- Get link
- Other Apps
सुतारवाडी परिसरात लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले जाणार-खासदार सुनिल तटकरे कोलाड -श्याम लोखंडे रोहा तालुक्यातील सुतारवाडी परिसरात लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले जाईल तसेच याबाबत पालकमंत्री अदितीताई तटकरे यांनी या कामासाठी मंजुरी दिली असून लवकरच कामाची निविदा निघून कामाला सुरुवात होणार असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या शुभारंभाच्या वेळी सांगितले. या ठिकाणी भव्य असा वनौषधी उद्यान सुद्धा लवकरच होणार असून वनऔषधी उत्पादन पाहण्यासाठी देशाच्या काना कोपऱ्यातील पर्यटक या ठिकाणी येथील असा विश्वास खासदार सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला. सुतारवाडी परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र झाल्यानंतर हजारो नागरिकांना फायदा होईल. सुतारवाडीसह येरळ, धगडवाडी, विजयनगर, कामथ, सावरवाडी, ढोकलेवाडी, जामगाव, जाधववाडी, पाथरशेत, जावटे, कुडली, अंबिवली, दुरटोली, नारायणगाव, अनेक ठिकाणच्या आदिवासीवाड्या आदिंना लाभ घेता येईल. सध्या सुतारवाडी येथे उपकेंद्र आहे आणि कोलाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. एखादी व्यक्ती आजारी पडली किंवा अपघात झाला तर द
- Get link
- Other Apps
कोलाडमध्ये जेनेरिक मेडिकलचा शुभारंभ सामान्य रुग्णांना मिळणार स्वस्त दरात औषधे कोलाड -श्याम लोखंडे मुबंई गोवा महामार्गावरील आंबेवाडी कोलाड नाक्यावर तिसे गावचे सुपुत्र नरेश बिरगावले यांचे श्री समर्थ जनआरोग्य जेनेरिक मेडिकल स्टोअर्सचे शुभारंभ कोलाड आंबेवाडी वरसगाव विभागीय युवा नेते तथा समन्वय समिती सदस्य राकेश शिंदे,यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी आंबेवाडी ग्राम पंचायत उपसरपंच जगन्नाथ धनावडे, सदस्य कुमार लोखंडे, बाळासाहेब फुलाटे सी ई ओ जनआरोग्य जेनेरिक प्रा. लि. अभिजित पाटणकर डायरेक्टर जनआरोग्य जेनेरिक प्रा.लि.सचिन साखलकर,अभिजित सातपुते,हेड ऑफ सेल्स मार्केटिंग ,संकेत पाटणकर एरिया बिजनेस हेड कोकण विभाग,लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा चे बोर्ड ऑफ डायरेक्टर तथा गांधी नर्सिंग होम चे व्यवस्थापक डॉ विनोद गांधी, कोलाड लायन्सक्लब चे खजिनदार डॉ श्यामभाऊ लोखंडे ,मेंबर्स नंदकुमार कळमकर, विश्वास निकम,जेष्ठ नागरिक ,खराटे व कोलाड परिसरातील डॉक्टर्स,रोहा तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जयवंत मुंढे ,संजय मांडलूस्कर ,राजेश कदम,राकेश लोखंडे,व आदी तिसे ग्रामस्थ व जेनेरिक जनआरोग्य सेवेचे सर्
- Get link
- Other Apps
तळा नगरपंचायतीला निधी कमी पडू देणार नाही- खासदार सुनिल तटकरे पाणी योजना,नाट्यगृह, एसटी स्टँड, नगरपंचायत इमारत उभारणार असल्याची खासदारांची ग्वाही तळा- संजय रिकामे तळा नगरपंचायत हद्दीतील तब्बल तीन कोटी रुपयांचे २१ विकासकामांचे भूमिपूजन रायगडचे लोकप्रिय खा.सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते तळा शहरात पार पडले या भूमिपूजन कार्यक्रमा नंतर पार पडलेल्या जाहीर सभेत खा.सुनील तटकरे यांनी तळा शहरासाठी पाणी योजना, नाट्यगृह, एसटी स्टँड आणि सुसज्ज तळा नगरपंचायत उभारणार असल्याची ग्वाही तळे वासियांना दिली या जाहीर सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तळा तालुका अध्यक्ष नाना भौड, शहर अध्यक्ष महेंद्र कजबजे,महिला अध्यक्षा जानव्ही शिंदे, नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,माजी बाल कल्याण सभापती गीता जाधव,मागासवर्गीय सेल रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.उत्तम जाधव,युवक अध्यक्ष नागेश लोखंडे,कैलास पायगुडे, किशोर शिंदे, प्रवीण अंबारले सर्व नगरसेवक नगरसेविका आणि तळेवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या भाषणात
- Get link
- Other Apps
मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्धपातळीवर वाहनचालकांना लवकरच दिलासा पोलादपुर-ऋषाली पवार मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक 66 याचे काम आता लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. गेली तीन वर्ष या महामार्गाचे काम सुरू होते त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच पर्यायी मार्ग कमी रुंदीचा असल्याने अपघात मोठ्या प्रमाणात घडत होते तसेच वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला . वारंवार होणारे अपघात व वाहतूक कोंडी पाहता आता महामार्गाचे काम अतिशय वेगाने सुरू करण्यात आले आहेत पोलादपूर तालुक्यातील भुयारी कारण देखील जवळ जवळ पूर्ण होत आले आहे. परंतु तोपर्यंत दुसऱ्या बाजूने आणि एक पर्यायी मार्ग काढण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न संबंधित कंपनीकडून सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहन चालकांना होणारा त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतो तसेच वारंवार होणारी वाहतूक कोंडी तसेच अपघात हे काही प्रमाणात होण्याची शक्यता आहे. हॉर्न मुळे होणारा त्रास तसेच धूळ, माती, गाड्यांमधून निघणारा धूर यामुळे पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. वाहतूक
- Get link
- Other Apps
"माणुसकी प्रतिष्ठान", शाखा अलिबाग उद्घघाटन सोहळा संपन्न रायगड जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे व जिल्हा परिषद समन्वयक श्री.जयवंत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती अलिबाग-प्रतिनिधी अक्षय तृतिया,मंगळवार दिनांक ३ मे २०२२ रोजी जिल्हा परिषद, रायगड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांच्या शुभहस्ते व जिल्हा परिषद, रायगड समन्वयक श्री. जयवंत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत, "माणुसकी प्रतिष्ठान", शाखा अलिबाग उद्घघाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.सदर कार्यक्रमास माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर संस्थापक अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, शाखा सांगोला अध्यक्ष श्री अतुल कावळे, शाखा पेण अध्यक्ष श्री आशिष कडू, मुख्य शाखा कार्याध्यक्ष श्री तानाजी आगलावे, सचिव श्री विशाल आढाव, गोल्ड कोस्ट सोसायटी अध्यक्ष श्री योगेश घरत तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास श्री वसंत जंजिरकर, श्री रावसाहेब माळी तसेच डॉ. ज्ञानदा फणसे यांच्या मातोश्री यांची विशेष उपस्थिती लाभली. माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर