रोह्याला रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्यात,तिकिट वाढ कमी व्हावी यासह अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ रोहा यांनी घेतली रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुंबई येथे भेट वरिष्ठ डी.आर. एम. अधिकारी मध्य रेल्वे यांनी मागण्या पुर्ण करण्याचे दिले आश्वासन मुंबई -प्रतिनिधी श्री.अभिजित धुरतसाहेब,अध्यक्ष महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ यांच्या प्रेरणेने, गुरुवार दिनांक २८/०७/२०२२ ला महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ पूर्वीची रेल्वे प्रवासी संघर्ष समिती रोहा,यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाऊन घेतली वरिष्ठ डी. आर. एम.अधिकारी यांच्या सोबत भेट घेतली.या भेटीत महासंघाने मागण्यांचे निवेदन सादर केले.ते पुढील प्रमाणे- १) सेंट्रल रेल्वे चे अंतिम स्टेशन रोहावरून सकाळी ६:३० ते ७:०० दरम्यान रोहा - दिवा अथवा पनवेल मेमु ट्रेन सेवा सुरू करा. २) पूर्वी थांबत असलेले मेल एक्सप्रेस थांबे रद्द केले ते पुन्हा मिळावे. उदा.दिवा - सावंतवाडी एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस,तुतारी एक्सप्रेस जे मेल ,एक्सप्रेस ट्रेन रोहा मध्ये तांत्रिक थांबे घेत अशा ट्रेन ना कायम स्वरुपी थांबे व तिकीट मिळावे. ३)
Posts
Showing posts from July, 2022
- Get link
- Other Apps
सर्वांसाठी डिजिटल समावेश आणि कनेक्टिव्हिटी हा सरकारच्या ‘अंत्योदय’ दृष्टीकोनाचा अविभाज्य भाग मुंबई -प्रतिनिधी सर्वांसाठी डिजिटल समावेश आणि कनेक्टिव्हिटी हा सरकारच्या ‘अंत्योदय’ दृष्टीकोनाचा अविभाज्य भाग आहे. वर्ष २०२१ मध्ये आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सरकारी योजनांच्या संपृक्ततेचे आवाहन केले. केंद्रीय मंत्रिमंडळाने दि. २७.७.२०२२ रोजी देशभरातील 4जी सेवांचा अंतर्भाव नसलेल्या गावांमध्ये मोबाइल सेवांच्या संपृक्ततेसाठी प्रकल्पाला मंजुरी दिली होती. 1) प्रकल्पाची एकूण किंमत रु. २६,३१६ कोटी 2) हा प्रकल्प दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील २४,६८० सेवांचा अंतर्भाव नसलेल्या गावांमध्ये 4जी मोबाइल सेवा प्रदान करेल. 3) पुनर्वसन, नवीन वसाहती, विद्यमान ऑपरेटरद्वारे सेवा काढून घेणे इत्यादी कारणांमुळे २०% अतिरिक्त गावे समाविष्ट करण्याची तरतूद या प्रकल्पात आहे. 4) याव्यतिरिक्त, फक्त 2G/3G कनेक्टिव्हिटी असलेली ६,२७९ गावे 4जी वर श्रेणीसुधारित केली जातील. गेल्या वर्षी सरकारने ५ राज्यांमधील ४४ महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांतील ७,२८७ अनावृत गावांमध्ये 4जी मोबाइल सेवा पु
- Get link
- Other Apps
लायन्स क्लब रोहा च्या अध्यक्षपदी अब्बास रोहावाला यांची निवड रोहा-प्रतिनिधी सुमारे ४८ वर्षांची परंपरा असलेल्या लायन्स क्लब रोहा च्या अध्यक्षपदी अब्बास रोहावाला यांची निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष नुरूद्दीन रोहावाला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अब्बास रोहावाला व त्यांच्या कार्यकारणी तील सहका-यांना मंथन मेहता यांनी शपथ दिली. यावेळी लायन्स च्या डिस्ट्रीक्ट चे प्रदीप सिनकर यांनी लायन्स क्लब रोहा चे सभासदत्व घेतलेल्या डाॅ अपूर्व भट, डाॅ तुषार राजपूत व लियाकत हाफिज यांना सभासदत्व दिले. नवनिर्वाचित अध्यक्ष अब्बास रोहावाला यांनी आगामी काळात रोह्यात डाॅ. भट क्लिनिक यांच्या सहकार्याने सुसज्ज डायलिसिस सेंटर लायन्स क्लब रोहा च्या वतीने उभे करण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच मोतीबिंदू मुक्त रोहा करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले. यावेळी नियुक्त करण्यात आलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे- झोन चेअरपर्सन- नुरूद्दीन रोहावाला,उपाध्यक्ष- सौ. सुश्मिता शिट्याळकर, भाऊसाहेब माने, सेक्रेटरी डाॅ.कृष्णा जरग, सहसेक्रेटरी-सौ.अर्चना कटिरा, खजिनदार- पराग फुकणे, सहखजिनदार- सौ.वर्षा सातपुते, संचालक - प्रदीप दामाणी,
- Get link
- Other Apps
'रोटरी क्लब ऑफ रोहा' कडुन भातलावणी कार्यक्रम संपन्न प्रत्यक्ष शेतात जाऊन केली भातलावणी रोहा-प्रतिनिधी पावसाळा सुरू झाला की रेनकोट, छत्री, पावसाळी चपला.. अशी जय्यत तयारी करून आपण स्वतःची काळजी घेतच असतो. पण शेतकरी शेतात जाऊन पावसाची तमा न बाळगता शेतात काम करीत असतो. पहिल्या पावसात भाताची रोपे करायची आणि पावसाने वेग धरला, की एका दमात कुटुंबाने भातलावणी करायची, अशी परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. परंतु प्रत्यक्ष शेतात काम करून एक दिवस तरी भातलावणी करावी, या भावनेतून रोटरी क्लब ऑफ रोहा च्या सदस्यांनी क्लब डायरेक्टर रो.हेमंत ठाकूर यांच्या विषेश सहकार्याने आणि अध्यक्ष रो.सुरेंद्र निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली दि. २२ जुलै २०२२ रोजी हिरवाईने नटलेल्या डोंगरदऱ्यांच्या कुशीत असलेल्या यशवंतरखार येथे भातलावणी चा नेत्रसुखद सोहळा संपन्न झाला. यावेळी क्लबचे अध्यक्ष रो. सुरेंद्र निंबाळकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. एक दिवस तरी जगाच्या पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांसाठी असावा यासाठी भातलावणी कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. भविष्यातही "रोटरी क
- Get link
- Other Apps
खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवक अध्यक्ष जयवंत दादा मुंढे यांचा स्तुत्य उपक्रम आदिवासी बांधवांना छत्र्या तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप रोहा-प्रतिनिधी बुधवार दिनांक 13 जुलै 2022 रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून राष्ट्रवादी रोहा तालुका युवक अध्यक्ष जयवंत दादा मुंढे यांनी खासदार सुनिल तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी आदिवासी बांधवांसाठी छत्र्या व शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संभे आदिवासी वाडी, बारसोली आदिवासीवाडी, लांढर आदिवासी वाडी, किल्ला आदिवासी वाडी, बाकडे पाले आदिवासी वाडी, धाटाव आदिवासी वाडी येथील सर्व कुटुंबांना छत्री वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणारे जयवंत दादा आदिवासी बांधवांसाठी गरजेला उपयोगी पडणाऱ्या वस्तू नेहमीच देत असतात.सध्या पावसाळा सुरू आहे,यावेळी आदिवासी बांधवांची गरज लक्षात घेऊन साहेबांच्या वाढदिवसानिमित्त छत्र्यांचे वाटप करण्यात आले. माजी पालकमंत्री तथा आमदार आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते छत्री व शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्
- Get link
- Other Apps
डॉ.तुषार राजपुत यांच्या क्लिनिकचे अष्टमी येथे उद्धघाटन रोहा - निखिल दाते पुणे येथील सुप्रसिद्ध डॉ.तुषार राजपुत व डॉ.कोमल राजपुत यांनी अष्टमी येथील एम्पायर पाम बिल्डिंग मध्ये नवीन क्लिनिक सुरू केले असून या क्लिनिकचा उद्धघाटन सोहळा बुधवार दिनांक 13 जुलै रोजी सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ .रघुनाथ भट यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी रोह्याचे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर ,डॉ .अपूर्व भट ,डॉ .पुजा भट ,डॉ .प्रशांत गोसावी ,डॉ .प्रिया गोसावी ,डॉ .तेजकुमार आपणकर ,डॉ .सविता किणीकर ,डॉ .अभिजीत जोशी , विद्या रोहेकर ,राकेश कागडा ,अकिल रोहावाला आदी मान्यवर उपस्थित होते. या निमित्ताने रोहे -अष्टमीकरांना आणखी एक सुसज्ज वैद्यकिय दालन मिळाले आहॆ.
- Get link
- Other Apps
हनुमान नगर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार , व शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप गितराज म्हस्के यांचा स्तुत्य उपक्रम रोहा-प्रतिनिधी रोहे शहरातील हनुमान नगर येथील सन -२०२२ या शैक्षणिक वर्षामध्ये उत्तमप्रकारे गुण संपादित करून उत्तीर्ण झालेल्या १०वी,१२वी व पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आणि शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करून गितराज म्हस्के हे सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम राबवित असतात.. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील गितराज म्हस्के यांच्या माध्यमातून सन -२०२१ / २२ या शैक्षणिक वर्षामध्ये उत्तमप्रकारे गुण संपादित करून उत्तीर्ण झालेल्या १०वी,१२वी व पदवीधर गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले तर शालेय विद्यार्थांना वह्या,रजिस्टर,पेन, पेन्सिल,कम्पोस बॉक्स शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने दरवर्षी महत्त्वपूर्ण उपक्रम ते राबवित असतात. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी उपक्रमश
- Get link
- Other Apps
दिव्यांग्यांना सक्षम करण्यासाठी शासना बरोबर समाजाचे सहकार्य अपेक्षित-आ.अदिती तटकरे तळा शहरात दिव्यांग्यांना धनादेश वाटप तळा- संजय रिकामे तळा नगरपंचायत हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना सन २०२१-२२ या वार्षिक वर्षातील ५% दिव्यांग निधीचे वाटप श्रीवर्धन मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार कु. आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते तळा शहरातील गणेश मंगल कार्यालयात दिव्यांग बांधवांना धनादेश वाटप करण्यात आले यावेळी त्यांनी अपंगांच्या वेदनेबाबत शासनासह समाजही नाते जोडण्यास त्यांना सहकार्य केल्यास ते अधिक सक्षम होतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,विरोधी पक्षनेत्या नेहा पांढरकामे,दिव्यांग संघटना तळा तालुका अध्यक्ष किशोर पितळे, शहर अध्यक्ष महेंद्र कजबजे तालुका अध्यक्ष नाना भौड, नगरसेवक मंगेश शिगवण,अविनाश पिसाळ,नरेश सुर्वे,रितेश मुंढे,नगरसेविका अर्चना तांबे,सारिका गवळी,माधुरी घोलप,स्वीकृत नगरसेवक प्रकाश गायकवाड,भास्कर गोळे,मुख्याधिकारी श्री.चव्हाण नगरपंचायत कर्मचारी वर्ग आणि दीव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Get link
- Other Apps
खासदार सुनिलजी तटकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने स्तुत्य उपक्रम मंगळवार दिनांक १२ जुलै २०२२ रोजी किल्ला येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन रोहा-प्रतिनिधी खासदार सुनिलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी,मोफत आणि अल्प दरात चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई मधील सुप्रसिद्ध तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरूळ यांच्या सहकार्याने हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच नेत्र तपासणी मोफत आणि अल्प दरात चष्म्याचे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक 12 जुलै 2022 रोजी सकाळी ठिक दहा वाजता हा कार्यक्रम ओम नमः शिवाय मंगल कार्यालय कालिदास हॉल किल्ला येथे संपन्न होणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक महेश बामुगडे,दिपक जमदाडे, रोहित माळी! नरेश बामगडे, दिनेश शिंदे, त्याचप्रमाणे विशेष सहकार्य श्री.रुपेश बामगुडे जनार्दन बामुगडे,प्रमोद दिघे यांनी केले आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -किल्ला, अश
- Get link
- Other Apps
सुंदरराव मोरे महाविद्यालयात आनंदवारी भक्ती गीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न पोलादपूर- ऋषाली राजू पवार पोलादपुर तालुक्याला फार मोठी परंपरा लाभली असून तालुक्यातील युवा पिढीने वारकरी संप्रदायाचा हा सांस्कृतिक वारसा पुढे न्यावा असे आवाहन ह. भ. प. गुरुवर्य रायगड भूषण श्री. विठ्ठल आण्णा घाडगे यांनी केले आहे. शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ महाड संचलित सुंदरराव मोरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील वाड:मय मंडळाच्या शैक्षणिक वर्ष २०२२- २३ मधील उपक्रमांच्या उद्धघाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आनंदवारी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे उद्धघाटन प्रमुख अतिथी श्री. विठ्ठल आण्णा घाडगे प्राचार्य डॉक्टर दिपक रावेरकर, उपप्राचार्य सुनील बळखंडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि विठ्ठलाची आरती करून करण्यात आले. यावेळी आपल्या प्रास्ताविकामध्ये मराठी विभाग प्रमुख व संत साहित्याच्या अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर रविंद्र सोमवंशी यांनी आरती, श्लोक ,स्तोत्र ,भजन इत्यादी विविध साहित्
- Get link
- Other Apps
नागोठणे येथील जलतरण स्पर्धेत कु.प्रथमेश गर्जे याने मारली बाजी रोहा-प्रतिनिधी खासदार सुनिल तटकरे साहेबांच्या वाढदिवसा निमित्ताने नागोठणे येथे जलतरण स्पर्धेचे शनिवार दिनांक ९ जुलै २०२२ रोजी आयोजन करण्यात आले होते.जोगेश्वरी मंदिराशेजारील मोटेचा तलाव(चौकोनी तलाव)येथे स्पर्धा संपन्न झाल्या. आमदार आदिती तटकरे व आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व युवा नेतृत्व विनायक गोळे यांनी स्पर्धेचे उत्तम नियोजन केले होते. रायगड जिल्ह्यातील अनेक जलतरणपटूंनी सहभाग घेतलेल्या ह्या भव्य जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये रोह्याचा बारा वर्षाचा कु. प्रथमेश सिमा गणेश गर्जे हा चौदा वर्षाच्या वयोगटातून प्रथम आला. त्याबद्दल आमदार श्री.अनिकेतभाई तटकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रथमेशचे अभिनंदन केले व त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कु.प्रथमेश गर्जे याने लहान वयात मिळविलेले यश कौतुकास्पद आहे.आपल्या कौशल्याच्या जोरावर प्रथमेश याने जलतरणामध्ये अनेक बक्षिसे मिळविली आहेत.कु.प्रथमेश याचे आई-वडिल प्राथमिक शिक्षक आहेत.त्यांनी आपल्या मुलाला पाठबळ देऊन त्याला एका नव्
- Get link
- Other Apps
बकरी ईद निमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद पनवेल-प्रतिनिधी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती पनवेल शाखा, सर्वोदय, हुसेनी फाऊंडेशन आणि ईतर सहयोगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल यांच्या सहकार्याने शनिवारी ९ जुलै रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात एकूण ५० जणांनी उपस्थिती होती. तसेच ३० जणांनी यावेळी रक्तदान केले. ९ जुलैला सकाळी ९.३० वाजेपासूनच रक्तदाते येण्याला सुरुवात झाली होती. सदर कार्यक्रमाचे उद्धघाटन ‘मानवता जपा’ आणि ‘हीच आमुची प्रार्थना, हेच आमचे मागणे’ या दोन गाण्यांनी झाली. महाराष्ट्र अंनिसच्या सुशिला मुंडे, राष्ट्र सेवा दलाचे अल्लाउद्दिन शेख, पत्रकार व संपादक किरण बाथम, ईतर राज्य कार्यकर्ते व रोटरी क्लब चे आणि पनवेल येथील शेलार हॅास्पीटल च्या डॅाक्टर शेलार यावेळी उपस्थित होते. यावेळी अल्लाउद्दिन शेख यांनी ‘ईद-उल-अजहा' (बकरी ईद) निमित्त बोलताना त्याग या मुल्याचा उल्लेख करत “बकरी ईद साजरी करताना रक्तदान करुन आपण बंधुभाव, प्रेम, आपुलकी जपण्याचे काम केलेले आहे. सर्व धार्मिक सण हे अधिकाधिक समाजाभिमुख व मानवतावादी करण्याचा विचार
- Get link
- Other Apps
खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने रायगड जिल्हा परिषद शाळा उडदवणे येथे विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप रोहा- प्रतिनिधी खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाचा उत्साह संपूर्ण रोहा तालुक्यात अनुभवायला येत आहे. साहेबांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला उडदवणे येथे एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची गरज ओळखून,दूरदृष्टी ठेवून या स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री.महेंद्र शिंदे सर यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविंद्र ठाकूर,पांडुरंग कासारे, संतोष गायकर,मोरेश्वर माळी,रुपेश कोल्हटकर ,प्रसाद गायकर,दर्शना गायकर,अनिल खंडागळे,सरिता गायकर,किशोर ठाकूर,दत्ता गायकर यांनी अथक परिश्रम घेतले.
- Get link
- Other Apps
खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने लांढर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व छत्री वाटप रोहा-प्रतिनिधी रायगडचे लोकप्रिय खासदार सुनिलजी तटकरे साहेबांचा वाढदिवस म्हणजे रोहे तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी पर्वणी असते.आपल्या लाडक्या साहेबांच्या वाढदिवसा निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांढर येथे श्री.अनिल भगत , श्री. जगदिश भगत, श्री.सतिश भगत यांच्यावतीने विद्यार्थ्यांना पिटि किट ड्रेस चे वाटप करण्यात आले . दसबा फाऊंडेशन किल्ला यांच्यावतीने विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. 👆व्हिडिओ पहा सदर कार्यक्रमास श्री.मधुकर पाटील,राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष,शंकरराव भगत- जिल्हा उपाध्यक्ष, सुरेश मगर -जिल्हा सरचिटणीस , अनिल भगत -तालुका उपाध्यक्ष, जयवंत दादा मुंढे-रोहा तालुका युवक अध्यक्ष, महेश बामुगडे, अरविंद मगर,सतिश भगत,मुकेश भोकटे, शिक्षक वर्ग , विद्यार्थी, युवक मंडळ व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी खासदार तटकरे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व उदंड आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
- Get link
- Other Apps
अदिती तटकरे यांचा मास्टर स्ट्रोक यशवंतखार विभागातील पाणी प्रश्न लागणार मार्गी यशवंतखार नळ पाणीपुरवठा योजनेसाठी रुपये 93 लाख 74 हजार निधी मंजूर करंजवीरा नळ पाणीपुरवठा योजनेसाठी रुपये 39 लाखांची मंजुरी तर धोंडखार तर्फे उमटे नळ पाणीपुरवठा योजनेसाठी रुपये 47 लाख 61 हजार निधीला मंजूरी रोहा-प्रतिनिधी यशवंतखार विभागातील पाणी प्रश्नावर गेले अनेक वर्ष राजकारण होत होते.खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार अनिकेत भाई तटकरे व तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी या विभागातील पाणी प्रश्न समजून घेऊन तो विक्रमी वेळात सोडविण्याचा चंग बांधला. त्याचीच पूर्तता म्हणून दिनांक 6 जुलै 2022 रोजी सुतारवाडी येथे विभागातील कार्यकर्त्यांकडे आमदार अदिती तटकरे व आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या शुभहस्ते नळ पाणीपुरवठा योजना निधी मंजुरीचे पत्र सुपूर्द करण्यात आले. नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नांची सोडवणूक कशी करावी? याचा मूर्तीमंत आदर्श तटकरे कुटुंबीयांनी दाखवून दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे यशवंतखार विभागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून विभागातील ग्रामस्थ व विशेषतः महिलावर्ग
- Get link
- Other Apps
रोहा रेल्वे स्टेशनवर QR कोड वरुन पेपरलेस तिकिट काढण्याची सुविधा उपलब्ध रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश रोहा-प्रतिनिधी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ रोहा युनिट्स, पुर्वीची रेल्वे प्रवासी संघर्ष समितीच्या प्रयत्नांने व रोहा रेल्वे स्टेशनच्या सहकार्याने रेल्वे प्रवासी महासंघाच्या मागणीनुसार रोहा रेल्वे स्टेशनवर तिकीट खिडकी येथे चारा QR कोड लावण्यात आले. त्यामुळे आता प्रवाशांना पेपर्स लेस मोबाईल तिकीट काढता येणार आहे. UTS अॕपवर QR code स्कॅन करून सर्व रोहा येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करावा तसेच रोहा रेल्वे स्टेशनवर दोन ATVM आॕटोमॅटीक मशिनवर आपण स्वतः पेपर तिकीट काढु शकता ,गुगल पे , फोन पे ,पेटीएम वर ATVM मशीनवर जनरेट झालेल्या QR स्कॅन करून पे करा लगेच तुम्हाला मोबाईल तिकीट काढता येणार आहे. हे सर्व करण्यासाठी विशेष प्रयत्न रेल्वे प्रवासी महासंघ रोहा युनिट्स चे श्री.फैजल अधिकारी , अध्यक्ष संकेत घोसाळकर : सचिव सौ.रविना मालुसरे -भोसले , भालचंद्र पवार, विश्वनाथ जाधव, प्रमोद गायकवाड,दिव्या सुर्वे ,नरेश कुशवाह, तपस्या कडू, मयुरी जाधव ,पुजा शेलार, सदस्य यांच
- Get link
- Other Apps
राकेश कागडा यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर पदी निवड रोहा-प्रतिनिधी रोहे शहर व परिसरात रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्री .राकेश कागडा यांची सन 2022-2023 या रोटरी वर्षाकरिता असिस्टंट गव्हर्नर पदी निवड करण्यात आली. श्री .राकेश कागडा यांनी या आधीही रोटरी मध्ये विविध पदे भूषवली असून ,रोटरीचे काम रोह्यात सुरू करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहॆ. रोटरी क्लब रोहाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अत्यंत उत्तम काम केलेले आहॆ. रायगड जिल्ह्यातील अलिबाग ,पेण ,गोरेगाव येथील क्लबचे ए .जी .पद राकेश कागडा यांच्याकडे देण्यात आले असून त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकक्षा रुंदावणार आहेत. श्री .राकेश यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहॆ.