Posts

Showing posts from September, 2022
Image
भजन सम्राट योगेशबुवा पाटील यांची भजन संध्या संपन्न खारी/ रोहा -केशव म्हस्के  रोहा तालुक्यातील वरसे भुवनेश्वर येथील वर्धमान रेसिडेन्सी निवासी संकुल रहिवासी मंडळाच्यावतीने नवरात्रोत्सव प्रसंगी चौथ्या दिवशी अलिबाग  रामराज दापोली येथील सुप्रसिध्द भजन सम्राट योगेशबुवा पाटील यांनी आपल्या वारकरी सांप्रदायिक संगीत भजन बारीच्या माध्यमातून गुरूवार रोजी शास्त्रीय संगीत भजन संध्याचे अप्रतिम सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.     भारत प्रांतांमध्ये सर्वत्र आई कुलस्वामिनी जगदंबेचा जागर निमित्ताने आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत आई कुलस्वामिनी जगदंब मातेची मूर्तीरूपामध्ये देवीची प्रतिष्ठापना करून दररोज पूजा विधी आरती जागरण गोंधळ हरिपाठ भजन आदी विविध अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमासह सांस्कृतिक परंपरा जपण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योगदान देत गरबा दांडिया नृत्य रासक्रीडा खेळून मानवी जीवनात आनंद उत्साह आणि जगदंबेच्या अतुलनीय पराक्रमाच्या प्रेरणेने प्रेरित होत दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कुलस्वामिनी व कुलदैवताचे नित्यनेमाने नामस्मरण करून कोणतेही पाऊल टाकल्यास यश नक्कीच मिळतो याची अनुभूती देणारा
Image
जागर स्त्री शक्तीचा,सन्मान नारीचा कोलाड मध्ये ६०० फ्रंटलाईन वुमन वर्कसचा सन्मान रोहा-प्रतिनिधी रायगडचे खासदार श्री.सुनिलजी तटकरे साहेब आमदार श्री.अनिकेत भाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी पालकमंत्री आमदार आदितीताई तटकरे यांच्या संकल्पनेतून रोहा तालुका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस यांच्या तर्फे जागर स्त्री शक्तीचा-सन्मान नारीचा.  नवरात्री उत्सवा निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला  रोहा तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका ताई ,अंगणवाडी मदतनीस व आशा सेविकाताई यांचा सन्मान माजी पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सुमारे 600 महिलांचा सन्मान करण्यात आला.  प्रास्ताविक सौ.प्रीतमताई पाटील महिला तालुकाअध्यक्षा यांनी केले.            या कार्यक्रमात वरसगांव येथील अंगणवाडी सेविका सौ.सुविधा सहदेव कापसे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात खासदार श्री. सुनिलजी तटकरे साहेब यांच्या प्रयत्नाने १९९६ साली एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत रोहा, माणगाव व सुधागड येथे अंगणवाडी केंद्र सुरू झाली व त्यात आम्हांला नोकरी मिळाली. म्हणून खासदार सुनिलजी तटकरे साहेबांना धन्यवाद दिले मा. राज्यमं
Image
गायत्री पतसंस्थेची २१ वी वार्षिक सभा संपन्न खारी/रोहा- केशव म्हस्के रोहे तालुक्यातील भुवनेश्वर येथील गायत्री नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थेची २१ वी सर्वसाधारण सभा मंगळवार दि.२७/०९/२०२२ रोजी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर वालेकर आण्णा यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाली.      सर्व प्रथम दिपप्रज्वलन करीत सरस्वती मातेच्या पूजनाने सभेस प्रारंभ करण्यात आले.     सभेच्या सुरुवातीला मागील सभेचे इत्तिवृत वाचून सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे अहवाल,ताळेबंद,नफा - तोटा पत्रक मंजूर करून नफा वाटणीस मंजुरी देण्यात आली मागील वर्षाचे हिशोब तपासणी अहवालाचे वाचन करण्यात आले.          यावेळी व्हॉईस चेअरमन सुकुमार पाटील,सेक्रेटरी संताजी ठाकूर,कोषाध्यक्ष दिलीप देशमुख,तज्ञ संचालक मंगेश शरमकर,मारुती शिवराम गोळे, दिपक विनायक पाटील,सुरेश नारायण कवळे,संजय आत्माराम पाटील,केशव रघुनाथ म्हस्के,रोहित रमेश गोविलकर,विशाखा विवेकानंद पोटे,स्वाती अरविंद पाटील आदी संचालक मंडळ कार्यालयीन कर्मचारी मनस्वी पाटील,दैनिक बचत प्रतिनिधी गजानन पाटील, नितेश म्हात्रे,आदी कर्मचारी वृंद व सभासद
Image
आमडोशी येथील परोपकारी वृत्तीचे कृष्णा जांभेकर यांचे निधन खारी-रोहे (केशव म्हस्के) रोहे तालुक्यातील आमडोशी येथील रहिवासी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  कृष्णा साधुराम जांभेकर यांचे रविवार दि.२५/०९/२०२२ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.       कृष्णा जांभेकर हे अत्यंत साध्या सरळ प्रेमळ,परोपकारी वृत्तीचे,मित भाषी ,नम्र स्वभावाचे व दयाळू अंत:करणाचे होते, त्यांचे वडिलोपार्जित शेतीवर व मुक्या प्राण्यांवर विशेष प्रेम होते.      त्यांच्या निधनाचे वृत समजतात कुणबी बांधवांसह, पंचक्रोशी परिसरातील सामाजिक,शैक्षणिक आदी विविध क्षेत्रातील  प्रतिष्ठित मान्यवर मंडळींसह त्यांचे आप्तस्वकीय मित्र परिवार व सगेसोयरे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेत त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.त्यांच्या निधनाने जांभेकर परिवारासह संपूर्ण पंचक्रोशी परिसरामध्ये दुःखाचे सावट पसरले आहे.         त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,दोन मुली नातवंडे, भाऊबंध आप्तस्वकीय,सगे सोयरे,नातेवाईक असा मोठा परिवार आहे.                               त्यांचे दशक्रियाविधी मंगळवा
Image
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहा तर्फे "जागर युवाशक्तीचा" कार्यक्रम उत्साहात संपन्न रोहा-प्रतिनिधी  दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा व डॉ. सी डी देशमुख महाविद्यालय रोहा यांचे संयुक्त विद्यमाने *जागर युवाशक्तीचा* कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सदरच्या कार्यक्रमास महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल साळुंके व गडकिल्ले अभ्यासक , लेखक श्री सुखदजी राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. को.म.सा.प. रोहा शाखेच्या अध्यक्षा सौ. संध्या दिवकर, सचिव श्री विजय दिवकर, युवाशक्ती प्रमुख श्री नारायण पानवकर, खजिनदार श्री हणमंत शिंदे ,सहसचिव सुधीर क्षीरसागर, युवाप्रतिनिधी कु. निकीता बोथरे, कु. शरद कदम, सौ.सुचेता तटकरे कु. अमिषा बारस्कर यांची उपस्थिती होती .  सी डी. देशमुख महाविद्यालयातील विदयार्थिनी कु. अमिषा शेट्टे , कु. केतकी सुतार यांनी तसेच प्राध्यापक सुकुमार पाटील डॉ. सम्राट जाधव तसेच कोमसाप शाखा रोहाचे श्री. हनुमत शिंदे, सुधीर क्षीरसागर, श्री. नारायण पानवलकर, कु. शरद कदम, सौ.संध्या विजय दिवकर, कु. निकीता बोथरे, कु. अमिषा बारस्कर,सौ. सुचेता तटकरे यांनी बहारदार कविता साद
Image
बच्चे कंपनीसाठी पर्वणी, तळा शहरात बाल उद्यानाची निर्मिती उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांच्या पाठपुराव्याला यश तळा- संजय रिकामे         कोरोना महामारीने गेले दोन वर्ष शाळा बंद होत्या. नुकत्याच सर्व शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनने लहान मुलांना घरात बंदिस्त करून ठेवले. मग मुलेही प्रचंड वैतागली. त्यात तळा शहरात एकही उद्यान नसल्याने त्यांच्या खेळावर मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा मेवा’, या पंक्तीप्रमाणे तळा नगरपंचायतीने शहरात श्री.चंडिका देवी परिसरात बाल उद्यानाची निर्मिती केली आहे.या उद्यानामध्ये परिसरातील लहान मुलांनी मोठया संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी केले आहे.                                         तळा नगर पंचायत हद्दीत बच्चे कंपनीसाठी छोटेसे बाल उद्यान असावे अशी मागणी सातत्याने पुढे येत होती. लहान मुलांना खेळण्यासाठी कोणतीही जागा नगरपंचायत हद्दीत उपलब्ध करून न दिल्याने लहान मुले आणि पालकांमध्येही नाराजीचा सूर उमटत होता.काही महिन्यांपूर्वी पत्रकार विराज टिळक तळा नगरपंचायत विरोधात उपोषण
Image
"कार्यकर्त्यांशी संवाद साधून अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते"-खा.सुनिल तटकरे जेष्ठ कार्यकर्त्यांशी खासदार सुनिल  तटकरे यांनी साधला मनमोकळा संवाद तळा -संजय रिकामे रायगड- रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांनी वयोवृध्दां सोबत बैठक घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला व त्यांच्याशी संवाद साधला तळा तालुक्यातील वयोवृध्दांसह जेष्ठ कार्यकर्ते समवयस्क यांच्या भेटीसाठी खा.सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कैलास पायगुडे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या सोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.यावेळी खा.सुनील तटकरे यांनी मला मोठी ऊर्जा मिळाली असल्याची भावना व्यक्त केली.यावेळी हिराचंद तांबे,पत्रकार पुरुषोत्तम मुळे,गणपत मांडवकर,महादेव गोळे,रघुनाथ शिंदे,काशिनाथ तांदलेकर,नथुराम अडखळे, आझाद म्हसकर, इसमाईल पल्लवकर,जाणू पाजणे,हाफीज भाई, भागोजी गोरीवले अशोक वाढवळ,तटकरे बुवा  विठोबा साबळे,आप्पा कदम, साधुराम पिंपळे,किसन मालुसरे, खांडेकर मामा,अशोक पाशीलकर दत्ता कांबळे,दीपक कोटिया,मारुती शिर्के, जाणू कीर्तने आदी मंडळी उपस्थित होती.खा.तटकरे यांनी त्यांच्या बरोबर मन मोकळ्या गप्पा तर म
Image
वरसगांवच्या अष्टपैलु व्यक्तिमत्वाची अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर कडून दखल श्री.सहदेव कापसे सर "समाज भूषण" पुरस्काराने आ.आदितीताई तटकरेंकडून सन्मानित रोहा-प्रतिनिधी अविष्कार सोशल व एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर ,अविष्कार फाउंडेशन रायगड जिल्हा यांच्यावतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२२ वरसगांव ता.रोहा येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री.सहदेव तुकाराम कापसे यांना देण्यात आला. श्रीवर्धन जि. रायगड येथे पार पडलेल्या कार्यक्रमात श्री.सहदेव कापसे सरांना, रायगड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री,विद्यमान आमदार कु. आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते व आविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजयजी पवार, रायगड जिल्हाध्यक्ष संदीपजी नागे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.  कार्यक्रमासाठी अध्यक्ष रविंद्र चौधरी पाटील,अविष्कार फाऊंडेशनचे तालुका अध्यक्ष प्रकाशजी कंठाळे सर यांची विशेष उपस्थिती लाभली. या संस्थेमार्फत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक विभागातील लोकांसाठी कार्याची दखल घेऊन दरवर्षी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साध
Image
रोहेकरांच्या रेल्वे समस्या व लोकल सुरू करण्यासाठी रोहा रेल्वे प्रवासी महासंघाच्या शिष्टमंडळाने घेतली खासदार सुनिल तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांची भेट रोहा-प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या पनवेल ते रोहा विभागात रोहा ते पनवेल आणि दिवा असा प्रवास करताना सकाळी ०५वा.१५ मिनिटानंतर एकही ट्रेन उपलब्ध नसल्याने प्रवशांना होत असलेल्या त्रास बद्दल रोहा रेल्वे प्रवासी महासंघाने मध्य रेल्वे कडे रोहा मधून सकाळी नवीन मेमु गाड्या सुरू कराव्या अशी मागणी लावून धरली आहे. परंतु रेल्वेच्या नकारात्मक मानसिकतेमुळे या गाड्या सध्या सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे सामान्य रेल्वे प्रवासी , विद्यार्थी , व्यापारी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.रोहेकरांच्या ह्या संवेदनशील  प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी, रोहा रेल्वे प्रवासी महासंघाने माननीय खासदार सुनिलजी तटकरे साहेब यांना भेटून आपल्या समस्या मांडल्या.     समितीने रोहा मधून सकाळी ०६.४५ मी नवीन रोहा-दिवा मेमु आणि ०७.३०नवीन रोहा -दिवा मेमु सुरू करावी अशी मागणी केली आहे. तसेच वाढलेले तिकीट दर पुन्हा पुर्वरत करावे असे सांगितले आहे.        कोरोना काळात रोहा थांबा रद्द केलेल्या गाड
Image
"कलेची जाण आणि जोपासना असणारा तळा तालुका"- खा.सुनिल तटकरे यांचे गौरवोद्गार  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानच्यावतीने नाचाचे जंगी सामने तळा- संजय रिकामे    नाच म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागात त्याकाळी लोकांच्या मनोरंजनासाठी जन्मलेल्या कला आहेत.त्या राज्याच्या सांस्कृतिक लोकधारा आहेत. तळ्या सारख्या कलेच्या क्षेत्रात लौकिक असलेल्या नगरीत असे महोत्सव येथील स्थानिक कलाकारांना मोठे प्रोत्साहन देणारे ठरतात.पहिल्यांदाच तळा तालुक्यात नचाचे जंगी सामने होत आहेत हा तालुका कलेची जोपासना करणारा असून या स्पर्धेत अनेक प्रतिभावंत कलाकारांनी आपली कला सादर केली त्यांचे आभार त्यांनी यावेळी मानले.व पुढील वर्षी असेच सामने भरवले जातील त्यासाठी प्रत्येक नाच मंडळाला दहा हजार रुपयांची देणगी सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान कडून देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.त्याचप्रमाणे भजन स्पर्धा देखील आयोजित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.                     राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सुनील तटकरे युवाप्रतिष्ठानच्या वतीने तळा तालुक्यातील नाचाचे जंगी कार्यक्रम तळ
Image
" नैसर्गिक शेती करा, देशासह आपणही सुजलाम् - सुफलाम् सुदृढ़ होऊ या "              - माधुरी देशपांडे रोहा -प्रतिनिधी रासायनिक शेतीला पारंपारिक समजणे दिवसेंदिवस घातक ठरत आहे. रासायनिक किटकनाशके, खतांच्या वाढत्या प्रमाणाने मातीचा दर्जा खालावत आहे. नदी, नाले, समुद्र यांसह पूर्णतः पर्यावरण बिघडत आहे. तापमानत मोठी वाढ झाली,  हे वेळीच न थांबवल्यास जगाला धोका आहे. त्यासाठी आपल्या नैसर्गिक शेतीकडे वळा, कॅन्सर व अन्य भयानक आजारापासून दूर रहा, नैसर्गिक शेती करा , देशासह आपणही सुजलाम् सुफलाम्, सुदृढ होऊ या असे मौलिक आवाहन स्किल विकास फाउंडेशनच्या प्रमुख, कृषी अभ्यासक माधुरी देशपांडे यांनी केले आहे . रोहा येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान व स्किल विकास फाउंडेशन आयोजित माती विज्ञान आणि नैसर्गिक फायदेशीर शेती विषयांवरील मार्गदर्शनावर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यावेळी शेतकरी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भगत, खजिनदार धनंजय जोशी, संचालक विनोद पाटील, दगडू बामुगडे, खेळू थिटे, उमेश पाटील, संतोष दिवकर, विजय दिवकर व शेतकरी बांधव उपस्थित होते. शेती ही बहुतांश
Image
रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल व ग्रामपंचायत रोठ खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न रोहा-प्रतिनिधी    सामाजिक क्षेत्रात रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल चे काम उल्लेखनिय असून सामाजिक हितासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असताना आज दिनांक १८-०९-२०२२ रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल च्या वतीने ग्राम पंचायत रोठ खुर्द ता.रोहा आई भवानी माता मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.  सदर कार्यक्रमास ग्राम पंचायत पूर्ण कमिटी व गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. सुरूवातीला ग्रामस्थांनी रोटरी क्लबच्या पदाधिकारी यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . जवळ जवळ १०० फळ झाडांची लागवड करण्यात आली.     कार्यक्रमात ग्राम पंचायत रोठ खुर्द च्या सरपंच सौ.गीता जनार्दन मोरे, रोटरी क्लब रोहा सेंट्रल चे अध्यक्ष रो. सुचित पाटिल, उपसरपंच सौ.सुनीता मोरे,माजी सरपंच लिलाधर मोरे,माजी उपसरपंच देवराम कर्णेकर,आगरी समाज तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र मोरे, ग्राम अध्यक्ष रो.लक्ष्मण मोरे, ग्राम पंचायत सदस्य राकेश मोरे, मंगेश मोरे, जनार्दन मोरे, प्रकाश डाके,नरेश मोरे, जेष्ठ नाग
Image
तळा -संजय रिकामे परेल येथे असणारे नाना पालकर स्मृती ट्रस्टचे व्यवस्थापक कृष्णा महाडिक यांनी कोराना काळात अनेक सामाजिक संस्थांकडून रुग्णांना मदत केली, रक्तदान शिबिर लाऊन रक्ताचा पुरवठा केला, गरजूंना अन्न धांन्याचे वाटप केलं, ऑक्सिजनचा पुरवठा केला, रायगड मध्ये चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,या नुकसानीत वैयक्तिक आणि शासकीय क्षेत्रात त्यांनी मदत पोचविली सामाजिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय काम सुरू आहे कृष्णा महाडिक यांचे सर्व सामान्यांच्या मनात घर केले आहे. सामाजिक क्षेत्रात पहिल्या रांगेत असलेले कृष्णा महाडिक कायम चर्चेत असतात.आता पुन्हा कृष्णा महाडिक यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. स्वरबंध सामाजिक संस्था पुरस्कृत या वर्षीचा स्वरबंध सेवा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते रायगड भुषण कृष्णा महाडिक यांना सावरकर स्मारक शिवाजी पार्क दादर येथे थोर संगीतकार अशोक पत्की व हॉटेल व्यवसायिक उद्योजक विठ्ठल कामत यांच्या शुभ हस्ते देण्यात आला.हा पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व स्तरातून कृष्णा महाडिक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Image
  बारपे लघुपाटबंधारे पूर्णत्वास नेणार -खा.सुनिल तटकरे महागाव जिल्हा परिषद गटात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण संपन्न तळा- संजय रिकामे रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या तळा तालुक्यातील महागाव जिल्हापरिषद गटात सकाळी ११ वाजल्यापासून संध्यकळी ७.०० वाजे पर्यंत विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले यामध्ये कोरखंडे येथे जल जीवन जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना १२.७५ लक्ष, बारपे येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना ४०.७५ लक्ष,महागाव ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटन १० लक्ष,अंगणवाडी इमारत लोकार्पण ८.५० लक्ष,विनवली येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना १९.९७ लक्ष,विनवली येथे सभागृह ५ लक्ष, काळसांबडे येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना ३०.८७ आणि सामाजिक सभागृह ५ लक्ष यांचे भूमिपूजन,गौळवाडी येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना २०.२४ लक्ष,अडणाले येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन ,तांबडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना भूमिपूजन ९.२१ लक्ष,तांबडी येथे मनाई मंदिर रस्ता १७ लक्ष भूमिपूजन,त
Image
कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेच्या विद्यमाने हिंदी भाषा दिन साजरा   रोहा-प्रतिनिधी  कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहाची मासिक सभा संपन्न झाली.यावेळी हिंदी भाषा दिन साजरा करण्यात आला. सभेची सुरूवात कु.स्वराज दिवकर याच्या सुश्राव्य श्री गणेश वंदनने करण्यात आली. सुरवातीला सचिव विजय दिवकर यांनी सर्वांचे स्वागत करून सभेचे इतिवृत्तांत वाचन केले.सभेत विषय घेऊन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सभेसाठी अध्यक्षा सौ.संध्या विजय दिवकर, जिल्हा प्रतिनिधी सुखद राणे,उपाध्यक्षा सौ.आरती धारप, सचिव विजय दिवकर, उपसचिव सुधीर क्षीरसागर, युवा शक्ती प्रतिनिधी नारायण पानवकर, कार्यकारिणी सदस्य शरद कदम,आचला धारप, संजीव शरमकर,अजित पाशिलकर, कु.स्वराज दिवकर इ.मान्यवर उपस्थित होते.  सर्व कवी कवयित्री यांनी हिंदी भाषा दिनानिमीत्त स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या हिंदी कविता सादर केल्या. तसेच स्वरचित कविता ही सादर करून कार्यक्रमास बहार आणली. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री.सुधीर क्षीरसागर यांनी केले.