रोह्यात जेष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेबांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त राज्य स्तरीय कुमार व मुली खो-खो स्पर्धेचे आयोजन
रोहा /अष्टमी-नरेश कुशवाहा
रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या 82 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान व रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन तर्फे परम पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले हायस्कूल धाटाव येथील नथुराम भाई पाटील पटांगणामध्ये 8 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2022 रोजी राज्य स्तरीय कुमार व मुली खो-खो स्पर्धा संपन्न होणार आहेत.
अशी माहिती रायगड जिल्हा खो-खो असोशिएशन अध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी आमदार अनिकेत तटकरे यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य खो-खो असोशिएशन उपाध्यक्ष विजयराव मोरे , कोठेकर सर ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष प्रितम ताई पाटील, स्नेहा ताडकर ,अमित मोहिते,अनंत मगर, सतिश भगत,घनश्याम कराळे,मयुर खैरे, किरण मोरे,प्रशांत बर्डे,महेश बामुगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार आनिकेत तटकरे यांनी माहिती देताना सांगितले की,ह्या स्पर्धेत राज्यभरातील 24 कुमार गट व 24 मुली गट भाग घेतील. प्रत्येक गटात 15 खेळाडू व त्यांचें मार्गदर्शक असे सुमारे एकुण 800 ते 1200 स्पर्धक उपस्थित राहणार आहेत.येणाऱ्या लोकांची रोहा रेल्वे स्थानकावरुन व एसटी स्टँडवरुन आणण्याची , राहण्याची व चहा, नाश्ता , जेवण आदीची सर्व व्यवस्था आपण करणार आहोत. या पटांगणात चार ग्राउंड करण्यात येणार आहेत.तर 2000 प्रेक्षक बसतील इतकी आसन व्यवस्था करण्यात येत आहे.सदर स्पर्धेसाठी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांनी अनुकूलता दर्शवली की आमंत्रण पत्रिके मार्फत सर्वांना कळविण्यात येईल. तसेच या स्पर्धेत कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा होणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धा जवळून पाहण्यासाठी परिसरातील मराठी माध्यमिक शाळा , जिल्हा परिषदेच्या शाळा, तसेच , इंग्लिश मिडीयम स्कूल यांना आमंत्रित केले जाणार आहे.
रोहेकरांनी रायगड जिल्ह्यातील खेळाडू ,राज्यभरातील खेळाडूंच्या खो खो खेळाचा आनंद घ्यावे असे आवाहन आमदार अनिकेत तटकरे यांनी केले.
यावेळी श्री. कोठकर सर यांनी बोलताना सांगितले की,सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे आज पर्यंत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा, खो-खो स्पर्धा, बाॅडी बिल्डर स्पर्धा आदी स्पर्धांचे उत्तम प्रकारे आयोजन केले आहे. त्याच प्रमाणे हि खो- खो स्पर्धा यशस्वीपणे पार पडेल असा दृढ विश्वास व्यक्त केला.
Comments
Post a Comment