मालसईच्या युवतीची अभिमानास्पद कामगिरी
"अवंतिका मोहिते "ठरली आयकाॅन आॕफ महाराष्ट्र माॅडेलिंग स्पर्धेची विजेती
रोहा-रविना मालुसरे-भोसले
फॕशन शो,माॕडलिंग हे शहरी युवा वर्गाचे असलेले स्वप्न एका छोट्याशा खेडेगावातील युवतीने आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर पुर्ण केले आहे.हि यशोगाथा आहे "अवंतिकाची".
रोहे तालुक्यातील मालसई गावची सुकन्या असलेली, अवंतिका अनिल मोहिते हि माॅडेलिंग स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करून विजेती ठरली आहे.
आयकाॅन आॉफ महाराष्ट्र यांच्या वतीने सदरची माॅडेलिंग स्पर्धा ही मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या स्पर्धेत संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध शहरं आणि विभागातून मोठ्या प्रमाणावर स्पर्धक सहभागी झाले होते. ग्रामीण भागातून या मोठ्या स्पर्धेत अवंतिकाने सहभाग नोंदवून या स्पर्धेत विजयाची मोहर उमटविल्याने तिच्या या सुयशाबद्दल सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.सध्या ती एम.बी.मोरे महाविद्यालय धाटाव येथे आपले विद्यालयीन शिक्षण घेत आहे.
माॅडेलिंग या क्षेत्राबद्दल अवंतिकाला लहानपणापासून विशेष अशी आवड असून त्याच क्षेत्रात आपले करिअर करण्याचा तिचा मानस असल्याचे तिने याबाबत माहिती देताना सांगितले.
अवंतिकाच्या उत्तुंग यशाबद्दल मालसई ग्रामस्थ, महिला मंडळ व तरूण मंडळ यांच्यासह संपूर्ण तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी तिचे अभिनंदन केले आहे.
"आदिशक्ती न्युज" कडून अवंतिका मोहितेचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
Comments
Post a Comment