एम.पी.एस. एस.इंग्लिश मेडि.कोलाडचा वार्षिक क्रीडा महोत्सव जल्लोषात साजरा
खांब-रोहा/नंदकुमार मरवडे
एम.पी.एस.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल आंबेवाडी-कोलाडचा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्सव पार पडला.
दिनांक २२ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आलेल्या या क्रीडा महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शासकीय अधिकारी सूर्यकांत विरकर व त्यांच्या पत्नी स्नेहा विरकर यांना निमंत्रित करण्यात आले होते तर सोहळ्याचे उद्घाटन शाळेचे उपाध्यक्ष सुनील महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांचे आगमन होताच दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेली मानवंदना ही पाहुण्यांना भारावून टाकणारी होती क्रीडांगणावरील व्यासपीठावर पाहुणे म्हणून विराजमान होतात क्रीडा स्पर्धेची ओळख असणारी मशाल मैदानात फिरवण्यात आली .पाहुण्यांचा सत्कार सुनील महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला तसेच शाळेचे उपाध्यक्ष सुनील महाडिक, शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली महाडिक आणि स्पोर्ट्स कॅप्टन यांचेही स्वागत करण्यात आले .त्यानंतर सर्वांनी सांघिक कवायत आणि केजी पासून सातवीपर्यंतच्या प्रत्येक वर्गाने क्रीडा साहित्यावर आधारित कवायत सादर केली. या सगळ्यांचे आकर्षण ठरले ते केजीच्या विद्यार्थ्यांनी कवायत कार्यक्रमाच्या उद्नधघाट प्रसंगी सादर करण्यात आलेल्या कवायतीने प्रमुख पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले. नंतर आठवीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य दाखविले तर नववीच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांबाचे प्रकार अतिशय शिस्तबद्ध सादर केले कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सूर्यकांत वीरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषण केले. सौ. स्नेहा विरकर यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली महाडिक यांचे कौतुक केले त्यासोबत विद्यार्थ्यांनाही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल शाबासकी दिली .स्नेहा विरकर यांच्या भाषणानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली महाडिक यांनी शाळेच्या क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर करीत जीवनात खेळाचे महत्व किती अनन्य साधारण आहे, हे मुलांना पटवून दिले.
Comments
Post a Comment