Posts

Showing posts from October, 2023
Image
मालसई गावचे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते मारुती धनावडे यांचे निधन रोहा- शरद जाधव   रोहा तालुक्यातील मालसई गावचे ज्येष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्ते मारुती भिकू धनावडे यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले  मारुती भिकू धनावडे हे प्रगतशील शेतकरी होते. गावच्या सामाजिक धार्मिक कामात सक्रिय सहभागी होते. शेतकरी कामगार पक्षाचे अनेक वर्षे एकनिष्ठ कार्यकर्ते होते.धामणसई  पंचक्रोशीत ते सर्वांना सुपरिचित होते. त्यांनी शेती करून आपले कुटुंब सांभाळले त्यांचा गोतावळा खूप मोठा आहे, सुधागड तालुक्यातील पोटलज या गावी त्यांचा धनावडे भावकी व खूप मोठा परिवार आहे. तीन मुले,एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.रायगड जिल्हा परीषद बांधकाम विभाग रोहा येथील बळीराम अण्णा धनावडे यांचे ते वडिल होते.   त्यांच्या अंत्ययात्रेस प्रचंड जनसमुदाय जमला होता दशक्रिया विधी शनिवार दि. 4 नोव्हेंबर रोजी राहत्या घरी तर उत्तर कार्य मंगळवार दि. 7 नोहोंबेर रोजी मालसई येथे होणार आहेत.
Image
  पाटबंधारे खात्याकडून उजवा तीर कालव्याला पाणी सोडण्याचे आश्वासन  रोहा-शरद जाधव  रायगड पाटबंधारे विभाग यांच्याकडून उजवातीर कालव्याची  पाहणी अधिकारी वर्गाकडून करण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकरी वर्गांना येत्या हंगामात उन्हाळी भात शेती करता पाणी सोडणार असे आश्वासन अभियंता महामुनी यांनी शेतकरी वर्गांना दिले.यावेळी सांगडे, मालसई, उडदवणे, मुठवली, धामणसई, सोनगाव मढ़ाली, पिंगळसई  येथील असंख्य शेतकरी वर्ग उपस्थित होते  गेली पंधरा वर्षे उजवातीर  कालव्याला भात शेती करता पाणी नाही .त्यामुळे पिंगळसई व देवकान्हे विभागातील शेती ओसाड व नापीक झाली आहे. पाणी नसल्याने गुराढोरांच्या पाण्याचा, वैरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात रखरखते वातावरण तयार झाले. झाडे फुले सुकून जात आहेत.शेतीला पाणी नसल्याने काही शेतकऱ्यांकडून शेती विकली गेली आहे.   सध्याची असलेली प्रचंड महागाई व वाढती बेरोजगारी पाहता शेतकरी वर्ग आता हतबळ  झाला आहे व कुठेतरी आता त्याला आपल्या पिकत्या जमिनीची आठवण होऊ लागली आहे. सध्या तरुण वर्ग हा प्रगतशील शेतीकडे  वळल्याने नवनवीन उत्पादने घेत आहेत. त्यामुळे आमच्या ओसाड जमिनीत पुन्हा आम्हाला मो
Image
  गोकुळ डेअरी चे रोह्यात शानदार उद्घघाटन रोहा 25 ऑक्टोबर (शरद जाधव) उत्तम क्वालिटी नामवंत ब्रँड अनेक वर्षाचे ग्राहकांशी अतूट नाते जपणारे गोकुळ दूध डेअरीने रोह्यात वरसे येथे पदार्पण केले आहे. सदर डेअरीचे उद्धघाटन आमदार अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विनोदभाऊ पाशिलकर, वरसे सरपंच नरेश पाटील,अनंतराव देशमुख, माजी नगरसेवक महेंद्र गुजर, अमित मोहिते, उद्योजक राम नाकती,उद्योजक प्रमोद भोसले, रोहा तालुका आगरी समाज अध्यक्ष हरिश्चंद्र मोरे, गोकुळ डेरी व्यवस्थापन दयानंद पाटील, सागर टोपकर, सुनील कडूकर, डिस्ट्रीब्यूटर संजय पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते  यावेळी मालक सुरज रामा म्हात्रे यांच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले   आमदार  अनिकेत तटकरे म्हणाले की, गोकुळ परिवाराने दूध संकलित करून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी वर्गांना सहकार्य केले आहे. गोकुळचे नाव जगभरात आहे .रोह्यात प्रथमच गोकुळ डेरी होत आहे. गोकुळचे वीस लाख लिटर दूध दररोज संकलित होते गोकुळच्या दुधाबरो
Image
  श्री अंबामाता नवरात्रोत्सवाची ४५ वर्षाची परंपरा. युवकांना पर्वणी.  तळा-किशोर पितळे-         तळा शहरातील श्री अंबामाता भैरवनाथचा नवरात्रोत्सव १९७९/८० साली मारवाड प्रांतातून व्यवसायाच्या निमित्ताने आलेले विलमराज मदनराज मेहता(देवीवाले मारवाडी शेठ) यांनी श्री अंबामातेचा फोटो तसबीर ठेवून (गरबा) दांडिया पहिला नवरात्रोत्सव सुरू केला.कै.यशवंत वेदक कै.प्रकाश पटेल,चंद्रकांत बारटक्के यांच्या सहकार्याने सोनारआळी येथे सुरु केला गरबा दांडिया रास हे त्याकाळी खास आकर्षण वाटत होते.आज संपुर्ण देशात नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. नवरात्रोत्सवात श्री अंबा मातेची नऊ रुपे असून शैलपुत्री, ब्रम्हचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिध्दीदात्री अशी नऊ रुपे धारण करून दृष्टप्रवृती राक्षसांचा नाश करून विजय प्राप्त केला. या विश्वजननी चा "उदो उदो" होऊ लागला.धन संपत्ती ऐश्वर्यासाठी सरस्वतीची पुजा केली जाते.श्री अंबा माता अतीशय जागृत देवी असून अनेक भक्तांच्या मनोकामना पुर्ण केली जातात.या देवीच्या दर्शनाला माणगांव रोहा इंदापूर गोरेगांव ठाणे मुंबई येथून अनेक भाव
Image
  कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेच्या अध्यक्षा सौ.संध्या विजय दिवकर या नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित  रोहा प्रतिनिधी  दि. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे साहित्यासाठीचा नारीशक्ती पुरस्कार सौ . संध्या विजय दिवकर यांना   समाज व बालकल्याण मंत्री, ना. आदितीताई सुनील तटकरे व आ . अनिकेतभाई सुनील तटकरे यांच्या हस्ते देण्यात आला .  समाजातील छोट्या छोट्या संस्थांतून होत असलेले समाजोपयोगी कार्य, आपल्या तीक्ष्ण नजरेने टिपून त्या त्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन प्रेरीत करण्याचे बहुमोल काम तटकरे कुटुंबिय नेहमीच सातत्याने करत आहेत .   सौ संध्या विजय दिवकर या पेशाने प्रा. शिक्षिका असून त्यांचे मूळगाव यशवंतखार आहे .सध्या त्या गायत्रीनगर - भुवनेश्वर, रोहा येथे रहात आहेत . सन- १९८९ पासून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षका, सन- २००६ पासून रोहा नगर पालिकेच्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.  सुमारे ४२ वर्षांनंतर मागील पंचवार्षिक मध्ये प्राथमिक शिक्षक पतपेढी रोहाच्या प्रथम महिला चेअरमन म्हणून सुद्धा त्याना बहुमान म
Image
  सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान तर्फे शासकीय योजना शिबिर मालसई-रोहा येथे दि.22 ऑक्टोबर 2023 रोजी पार पडले रोहा -प्रतिनिधी  यावेळी 190 नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी  आयुष्यमान भारत कार्ड किसान सन्मान निधी योजना पॅन कार्ड श्रम कार्ड आभा कार्ड जनधन अकाउंट माझी कन्या भाग्यश्री योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अश्या सर्व योजनांचं नागरिकांना मोफत लाभ देण्यात आले. सदर शिबिरात सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान चे संस्थापक रोशन चाफेकर,अध्यक्ष किरण कानडे व सचिव हाजी कोठारी यांनी योजनांवर योग्य मार्गदर्शन केलं आणि ती योजना लोकांना शेवटंपर्यंत कशी भेटेल याचे आश्वाशन  दिले. सुराज्य विविध योजनाचे लाभ नागरिकांना मिळवून देत असते. या शिबिराच्या माध्यमतून लोकांचे प्रश्र्न जाणून घेवून त्यावर पुडील कार्यक्रम कसे करता येतील याची सुद्धा नियोजन करुन लवकरात लवकर आपण करू असे रोशन जी यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे कार्यक्रम प्रमुख म्हणुन  अनिल घरजले,कृष्णा गोमतांदेल, रिया कासार,, रिद्धी बोथरे, सोशल मीडिया प्रमुख कुणाल आंबळे सल्लागार कमलेश चांदेकर सुराज्य चे मालसई विभाग प्रमुख शुभम मोहिते तसेच मालसई ग्रामपंचायत च
Image
  शिवसेना  उद्धव ठाकरे गटाला हादरा; ग्रा.पं.उमेदवार आणि ग्रामस्थ यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश  तळा संजय रिकामे             तळा तालुक्यात मांदाड ग्रामपंचायतीमध्ये अपेक्षेप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे.उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंच आणि सदस्य पदाचे उमेदवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुतारवाडी येथील पक्ष कार्यालयात जाहीर प्रवेश केला. यावेळी तालुका अध्यक्ष नाना भौड, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, सामाजिक न्याय विभाग रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. उत्तम जाधव, उपजिल्हाध्यक्ष कैलास पायगुडे,युवक अध्यक्ष नागेश लोखंडे,माजी उपसभापती गणेश वाघमारे जगदीश शिंदे नरेश पाजणे,अनंत लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.या पक्ष प्रवेशामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून त्यांना हा मोठा हादरा बसला आहे. मांदाड ग्रामपंचायत येथील विकास कामे केवळ सुनील तटकरे साहेबांनी केली असून पुढील देखील विकास कामे तटकरे साहेब करतील असा असा विश्वास बसल्याने व योग्य तो मान सन्मान मिळणार असल्यानेच आम्ही राष्
Image
  शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान मंजूर तळा कृषी विभागाकडून दोन लाखाचा निधी वर्ग तळा प्रतिनिधी कृष्णा भोसले.  तळा शहरातली सुतारवाडी येथील शेतकरी कै. प्रतीक नंदकुमार सुतार (वय २९) यांचा दिनांक २० एप्रिल २०२३ रोजी कसारा नासिक येथे रस्ते अपघात झाला होता त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते त्यानंतर त्यांच्या वरती रूग्णालयामध्ये उपचार करण्यात आले परंतु त्यांनी उपचारास प्रतिसाद न दिल्याने त्यांचे  दिनांक २० एप्रिल २०२३ रोजी दुःखद निधन झाले.घरातील तरुण व कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबावर संकट कोसळले या अपघाताबाबत कृषी  पर्यवेक्षक सुनील गोसावी यांना माहिती मिळाल्यावर अपघातग्रस्त कुटूंबाची भेट घेऊन त्यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना विषयी माहिती दिली व योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ती कोणाकडे मिळतात याबाबत मार्गदर्शन केले व कागदपत्रांची पूर्तता होताच कै. प्रतीक नंदकुमार सुतार यांचे वारस म्हणून त्यांचे वडील श्री नंदकुमार धोंडू सुतार यांचे नावे प्रस्ताव तयार करण्यात आला सदर प्रस्ताव दिनांक २१ ऑगस्ट २०२३ रोजी मा तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या त
Image
खारगाव येथे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचे अर्ज भरताना आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती  खारी - केशव म्हस्के                            रोहे तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या खारगाव ग्राम पंचायत पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार खारी - काजुवाडी गावचे अध्यक्ष श्री दत्तात्रेय काळे उमेदवारीचे नामनिर्देशन अर्ज भरतावेळी विधान परिषद सदस्य कार्यसम्राट आमदार अनिकेत तटकरे,जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर,माजी उपसरपंच नितीन मालुसरे,महेश शिर्के,श्याम भाऊ एस पाटील,आदी खारी ग्रामस्थ मतदारांच्या व तालुक्यातील प्रमुख नेतेगण व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी अलंकार भोईर,गणेश लोंढे यांच्या सुपूर्त करताना.. छायाचित्र :- केशव म्हस्के (खारी/ रोहा)
Image
  आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने रोहा तालुका राष्ट्रवादी राष्ट्रवादी युवक यांचा संयुक्त विद्यमानातून LED टीव्ही व सायकलचे वाटप रोहा प्रतिनिधी            आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा तालुका राष्ट्रवादी व युवक काँग्रेसच्या संयुक्त विद्यमानाने 50% सवलतीत LED टीव्ही व सायकल वाटप कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या स्टॉलचे उद्घाटन शनिवार दिनांक 14 ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र राज्य महिला व बालकल्याण मंत्री अदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते पार पडला.रोहा तालुका युवक अध्यक्ष जयवंत दादा मुंडे यांच्या प्रयत्नातून LED टीव्ही व सायकलचे वाटप करण्यात येत आहे. याचा कालावधी 14 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर पर्यंत आहे.   या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी रोहा तालुका महिला अध्यक्षा प्रीतम पाटील, युवा नेते राकेश शिंदे, युवती अध्यक्षा रविना मालुसरे, आंबेवाडी उपसरपंच कुमार लोखंडे,वरसगाव सरपंच राजीवले,कोलाड पोलीस निरीक्षक साबळे साहेब,मनोज शिर्के, जगन्नाथ धनावडे, महेंद्र वाचकवडे, अवि पालंगे, नितीन जाधव,बंधू कदम, गणेश वाचकवडे, संदीप जाधव, संजय मांडलूस्कर,स्वप्निल शिंदे,हेमंत मालुसरे
Image
  आदर्श गाव सोलमवाडी  येथे वाचन प्रेरणा दिन साजरा तळा प्रतिनिधी कृष्णा भोसले.                ए.पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त सोलमवाडी गावातील मुले आणि पालकांसोबत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुंबई मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात वाचन प्रेरणा दिनाचे महत्व सांगाण्यात आले.वाचनाचे महत्व किती आहे याविषयी माहिती देण्यात आली. मुलांचे वाचन सुधारण्यासाठी पालकांनी आणि मुलांनी कशाप्रकारे नियोजन केले पाहिजे यावर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी सर्व मुलांना त्यांच्या आवडीनुसार गोष्टीचे पुस्तक निवडण्याची संधी देऊन त्यांना वाचन करण्यास सांगण्यात आले.सर्व मुलांना तीन - चार गोष्टीची पुस्तके भेट म्हणुन देण्यात आली. तसेच काही पुस्तके ही अंगणवाडीमध्ये ठेवण्यात आली आहेत .                          सदर कार्यक्रमाच्या वेळी ग्रामीण अध्यक्ष श्री बाळकृष्ण बांद्रे, सचिव श्री राजेश सोलम, खजिनदार श्री तुकाराम पाटेकर, सल्लागार श्री केशव सोलम, विद्यार्थी आणि पालक उपस्थीत होते.         या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही पुस्तके
Image
आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळा तालुका राष्ट्रवादी विभाग मुंबई कडुन रूग्णालयात फळ वाटप.  तळा प्रतिनिधी- कृष्णा भोसले.          स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळा राष्ट्रवादी मुंबई विभागाचे वतीने केईएम हॉस्पिटलमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी गरीब गरजु रुग्णांना फळ वाटप केले आहे.      यावेळी तळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई अध्यक्ष जनार्दन शिगवण,उपाध्यक्ष भाऊ गवाणकर, उपाध्यक्ष किसन बालगुडे, सरचिटणीस सुरेश गंभीर, युवा अध्यक्ष   नितीन शिगवण, मांदाड गण अध्यक्ष संदेश वाजे,  विभागीय अध्यक्ष मोरेश्वर अंधारे, विभागीय चिटणीस पांडुरंग रायकर, अनंत राणे यासारखे कार्यकर्ते उपस्थित होते. 
Image
  शाळा वाचवा" अभियानाला प्रचंड प्रतिसाद. तळा प्रतिनिधी कृष्णा भोसले.  बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी पनवेल येथील लोकनेते दि.बा. पाटील साहेबांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पनवेल मध्ये ज्या कॉलेज ची मुहूर्तमेढ रोवली अशा महात्मा फुले कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स ह्या कॉलेजच्या सभागृहात शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच शाळा वाचवा अभियान अंतर्गत *८ वी तालुकास्तरीय शिक्षण हक्क परिषद* मोठ्या उत्साहात आणि तरुणाईच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली.  परिषदेचे उद्घाटन वरिष्ठ बहुजन नेते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे *मा. न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील साहेब* ह्यांनी केले तर अध्यक्ष स्थानी शिवराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक सल्लागार *CA निलेश पाटील* होते, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष *शिवश्री संजय घरत* होते तर प्रमुख पाहुणे म्हणून  अतुल दिबा पाटील आणि महात्मा फुले कॉलेज चे प्राचार्य श्री गणेश ठाकूर होते. तर संविधान वाचन *शिवश्री.विराज जाधव* यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे *प्रवक्ते शिवश्री.विकी कदम* ह्यांनी केले तर शिवराज्य प्रतिष्ठानची ध्येय धोरणे शिवराज्य चे *
Image
  ८ वी   शिक्षण परिषद पनवेल येथे ११ ऑक्टोबर ला होणार "शिक्षण हक्क परिषद" तळा प्रतिनिधी कृष्णा भोसले.  शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मराठी विभाग महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  दिवंगत मा. खासदार लोकनेते दिबा पाटील साहेब यांचे गुरु महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शाळा वाचवा अभियानांतर्गत ८ वी शिक्षण हक्क परिषद दि. ११ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी १०:३० ठिकाण: सभागृह, रयत शिक्षण संस्थेचे मराठी विभाग महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पनवेल. येथे संपन्न होणार आहे, महाराष्ट्रामध्ये 62000 शाळा दत्तक देण्याचा निर्णय अदानी संस्थेकडे शासनाचा झाला आहे त्यामुळे 62 हजार शाळा वाचवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र शिक्षण हक्क परिषदा आयोजित करून समाज जागृती केली जात आहे शिक्षणाचे होणारे खाजगीकरण थांबवले पाहिजे, पहिली ते आठवी ढकल्पाचा निर्णय रद्द करू सक्तीच्या परीक्षा घ्याव्यात व मराठी मिडीयम सोबत इंग्लिश मीडियम शासनाने सुरू करावे या प्रमुख विषयावर परिषदेमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे या परिषदेमध्ये
Image
  तळा तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीसाठी सत्ता संघर्ष महविकास, महायुती बाजूला पडणार तळा संजय रिकामे तळा तालुक्यात भानंग,तळेगाव,चरई खुर्द, निगुडशेत, मांदाड,गिरणे या सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, यावेळेस स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट भाजपच्या गटातच लढती होणार आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीत वर्चस्व राखण्यासाठी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे गट व भाजपच्या नेत्यांनीही लक्ष घातल्यामुळे या तीन पक्षातच सत्ता संघर्ष रंगणार आहे.तळा तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असूनही मागील राहटाड आणि काकडशेत ग्रामपंचायत थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला होता नंतर याच सरपंचांचा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करून त्यांनी आपले बाले किल्ले शाबूत ठेवले.शिंदे गट आणि भाजपा यांची तळा शहरात वर्चस्व असुन या दोन पक्षांना ग्रामीण भागात आपली ताकद वाढविण्याच्या दृष्टिकोनातून काम सुरू केले आहे.त्यामुळे यावेळेस आता शिंदे गट आणि भाजपने सर्व निवडणुकांत लक्ष घालण्याची तयारी केली आहे.   
Image
  राहटाड ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बळ, मंगला मंगेश कंबु यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश तळा संजय रिकामे तळा तालुक्यात डिसेंबर २०२२ मध्ये राहटाड ग्रामपंचायत निवडणूक पार पडली या निवडणुकीत भाजपने थेट सरपंच आणि पाच सदस्य जिंकताना एकहाती सत्ता काबीज केली होती परंतु भाजपला सत्ता टिकवता आली नाही सरपंच मिताली करंजे यांनी ६ ऑगस्ट २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश करून भाजपला मोठा धक्का दिला होता त्याचीच पुनरावृत्ती झाली असून प्रभाग क्रमांक ३ मधून निवडून आलेल्या भाजपा उमेदवार मंगला मंगेश कंबु यांनी सुतारवाडी येथील पक्ष कार्यालयात खा.सुनील तटकरे यांच्या उपस्थतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला खा.सुनील तटकरे यांनी मंगला मंगेश कंबु आणि मंगेश विठोबा कंबु यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाल घालून त्यांचे स्वागत केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.उत्तम जाधव तालुका अध्यक्ष नाना भौड,उपजिल्हा अध्यक्ष कैलास पायगुडे,तन्वीर पल्लवकर नारायण बालबा,सागर करंजे आदी मान्यवर उस्थितीत होते या पक्ष प्रवेशामुळे भाजपला पुन्हा एकदा
Image
  महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट तळा शाखा अध्यक्ष पदी खेळु वाजे यांची फेर निवड तळा संजय रिकामे महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट ही गवळी समाजाची शिखर संस्था असुन दी.८.१०.२३ रोजी वृंदावन येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत तळा स्थानिक शाखा  कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली. कासेवडी गावचे सुपुत्र अशोक लोखंडे विद्यामंदिर पीटसईचे चेअरमन सामाजिक कार्यकर्ते खेळु वाजे यांना अध्यक्षपदी पून्हा संधी देण्यात आली आहे.वाजे हे मन मिळावू शांत,स्वभाव,अभ्यासू व नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत असल्याने त्यांची ट्रस्ट अध्यक्ष पदी फेर निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनदंन होत आहे.संपूर्ण गवळी समाजाला एकत्रित करण्याचे काम आम्ही करणार असून समाजाच्या वतीने समाज उपयोगी उपक्रम राबविण्यावर आमचा अधिक भर असणार आहे समाजाच्या समस्या सोडविण्या बरोबरच युवकांशी संपर्क साधून त्यांना समाजकार्यासाठी जोडण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे नव नियुक्त अध्यक्ष खेळु वाजे यांनी म्हटले आहे.                                                                          ट्रस्ट कार्यकारणी बिनविरोध निवड करण्यासाठी सामूहिक निर्णय
Image
  २९० दिवसांत ३६१ गडकिल्ले सर करणाऱ्या  सुबोध गांगुर्डे ने साधला रोहेकरांशी संवाद! रोहा सिटिझन फोरम आणि रोहा प्रेस क्लबने केला सुबोधच्या शौर्याचा सन्मान!  सुबोधला माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे केले आवाहन. रोहा दि. ०८ ऑक्टो. प्रतिनिधी :-   शिवरायांनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र सार्वभौम स्वराज्याचे रक्षण दऱ्याखोऱ्यातील गडकोट किल्यांनी केले. शिवरायांच्या स्फुर्तीदायी इतिहासाची साक्ष देणारे शेकडो गडकिल्ले संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेले आहेत. त्यापैकी ३७० किल्ल्यांवरील माती गोळा करण्याचा संकल्प केलेल्या सुबोधने गेल्या २९० दिवसांत ३६१ गडकिल्ले पादाक्रांत करून सुबोध नुकताच आपल्या गावात रोह्यात आला. रोहा सिटिझन फोरम आणि रोहा प्रेस क्लबने गुरुवारी शासकीय विश्रामगृहात सुबोधच्या गडकोटांवरील सुरू असलेल्या मोहिमेसंदर्भात सेशन आयोजित केले होते. यावेळी सुबोध गांगुर्डे यांनी रोह्यातील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांसोबत संवाद साधला, सुबोधशी संवाद साधण्यासाठी आणि सुबोधला प्रोत्साहित करण्यासाठी यावेळी शिवप्रेमींनी गर्दी केली होती. यावेळी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्य
Image
  रोहा उपजिल्हा रुग्णालय येथे "दिव्यांग कल्याण विभाग - दिव्यागांच्या दारी "अंतर्गत तोफिक फारुक शिलावट दिव्यांगास तीन चाकी सायकल चे वितरण. खारी/ रोहा (केशव म्हस्के)         " दिव्यांग कल्याण विभाग - दिव्यागांच्या दारी "अंतर्गत सहयोग अपंग कल्याणकारी संस्थेच्या अथक प्रयत्नाने रोहा उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.अंकिता मते,संस्थेचे अध्यक्ष  राजेंद्र कांबळे,उपाध्यक्ष नंदलाल गुप्ता आदीं मान्यवरांच्या हस्ते सुंदर नगर रोहा येथील दिव्यांग तोफिक फारुक शिलावट यास तीन चाकी सायकल वितरण करण्यात आले.      " दिव्यांग कल्याण विभाग - दिव्यांगांच्या दारी"अभियान चे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या प्रमुख्य उपस्थितीमध्ये जिल्हा स्तरीय मेळाव्यामध्ये"दिव्यांग कल्याण विभाग - दिव्यांगांच्या दारी " अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यागांच्या गरजांनुसार  विविध प्रकारच्या योजनांचा लाभ व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले याच अनुषंगाने शुक्रवार दि.०६ ऑक्टोंबर रोजी सहयोग अपंग कल्याणकारी संस्थेच्या अथक प्रयत्नाने रोहा उपजिल्हा र
Image
धामणसई आदिवासी वाडी येथे सापडला एका महिलेचा मृतदेह रोहा प्रतिनिधी              धामणसई आदिवासी वाडी मधील महिला नाव लक्ष्मी रामा वाघमारे वय 60 वर्ष ती राहत असलेल्या झोपडी पासून 50 मीटर अंतरावर जंगला मधील पायवाटेवर तिला खाली बसायला पाडून तिचे तोंड जमिनीत दाबून तिला जीवे मारण्यात आले आहे. तिच्या डोक्यावर दगड ठेवलेला मिळून आला आहे. सदर बाबत गु. र. क्र 156/23 कलम 302 भा द वी गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
Image
  अंशुल कंपनीतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व जयवंत काका घरत सन्मानपूर्वक सेवानिवृत्त.. खारी/ रोहा - केशव म्हस्के       धाटाव औद्योगिक वसाहतीमधील अंशुल स्पेशॉलिटी मोल्यु.प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मधील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व जयवंत आप्पा घरत वयोमानानुसार वयाच्या ५८ व्या वर्षी बुधवार दि.०४/ऑक्टोंबर रोजी सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाले.       जयवंत आप्पा घरत काकांनी अंशुल कंपनीमध्ये ईमाने इतबारे प्रामाणिकपणे सेवा बजावित तब्बल २८ वर्षे ०६ महिने १५ दिवस कंपनीच्या भरभराटी व प्रगतीमध्ये मोलाचे महत्त्वपूर्ण योगदान देत शून्यातून विश्व निर्माण करीत पूर्वाश्रमीची निर्मळ केमिकल्स कंपनी  आजची अंशुल स्पेशॉलिटी मोल्यु.प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सन- १९९४/९५ साली कायमस्वरूपी प्लांट ऑपरेटर म्हणून उत्पादन विभाग काम करत सेफ्टी विभाग,कॅन्टीन,आदी विविध विषय कमिटयांमध्ये काकांचे प्राधान्याने सहभाग असायचे तसेच सामाजिक,शैक्षणिक,राजकीय, कला - क्रीडा  रायगड जिल्हा कब्बडी असोसिएशन चे सदस्य आदी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून संघटनात्मक काम देखील जबाबदारीपूर्वक चोखपणे बजावित आहेत..         ज्ञत्यांच्या आजच्या सेवानि
Image
  तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचा साखरचौथ गणपती उत्सव संपन्न तळा-किशोर पितळे              तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे बालविकास, प्राथमिक विद्यामंदिर,गो म वेदक विद्यामंदिर,पन्हेळी हायस्कूल,कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, द ग तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा या विद्याशाखेच्या वतीने साखरचौथ गणपती उत्सव२०२३ चे आयोजन करण्यात आले होते साखरचौथ गणपती उत्सवाचे हे दुसरे वर्ष होते.दिनांक १ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता राधाकृष्ण मंदीरातून नगरपंचायत, बाजारपेठ, बळीचा नाका, मुळे हॉटेल ते तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यासंकुल अशी डी जे च्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थापदाधिकारी,सर्व विद्याशाखेचे शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी सहभागी झाले होते.दिनांक २ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता संस्थेचे सचिव मंगेश देशमुख सौ नेत्रा देशमुख यांच्या हस्ते गणपतीची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी रोहित भागवत यांनी पौरोहित्य केले. सकाळी १० वाजता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती आणि डॉ. सी डी देशमुख यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सकाळी
Image
आश्विनी आनंद माळी परिवार प्रतिष्ठान तर्फे बोरघरहवेली हायस्कूल मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप.  तळा प्रतिनिधी कृष्णा भोसले.  आश्विनी आनंद माळी परिवार प्रतिष्ठान तर्फे ज्ञानदीप मंदिर विद्या मंदिर बोरघरहवेली येथे विद्यार्थी विदयार्थिनीना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.      सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, याचें प्रतिमेला पुष्पहार घालुन वंदन करण्यात आले. ईशस्तवन, स्वागत गित घेतल्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.      यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिपक रसाळ, कोषाध्यक्ष पांडुरंग माळी, प्रतिष्ठान चे अध्यक्ष आनंद माळी, सचिव सचिन गायकवाड, गौतम माळी, कृष्णा राव, शाळा मुख्याध्यापिका किरण चव्हाण, धम्म दिप सेवा संघ सोनसडे पदाधिकारी, महीला शिक्षकेत्तर कर्मचारी विदयार्थी, विदयार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.    यावेळी प्रतिष्ठान चे सचिव सचिन गायकवाड, यांनी आपल्या  प्राताविक भाषणात गेल्या चार वर्षे प्रतिष्ठान तर्फे गरीब गरजु विदयार्थ्यांना व्या, पेन, पेन्सिल, पुस्तके यांचे वाटप केले जाते. आश्विनी माळी यांचे चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आज बोरघरहवेली हायस्कूल च्या विद्या
Image
  पीएम किसान ई केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ   १० ऑक्टोबर पर्यंत ई केवायसी पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना तळा कृष्णा भोसले                   प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. व राज्यशासन सुद्धा याच  योजनेतील पात्र  लाभार्थीना सहा हजार रुपयांची वाढीव आर्थिक मदत देणार आहे परंतु तालुक्यातील बऱ्याच पात्र  लाभार्थ्यांचे ई केवायसी प्रमाणिकरण, बँक खाते आधार सलग्न करणे व भुमिअभिलेख नोंदी अदयावत करणे प्रलंबित आहेत या बाबी केंद्र शासनाने पूर्ण करणे अनिवार्य केल्या आहेत. या अगोदर  शासनाच्या सुचनेनुसार जे लाभार्थी दि.१ ऑक्टोबर पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करनार नाहीत तसेच बँक खाते आधार संलग्न करणार नाही त्यांची नावे पीएम किसान योजनेतुन वगळण्यात येणार आसल्याच्या सूचना कृषी विभागास प्राप्त झाल्या होत्या परंतु केंद्र शासनाच्या सुधारित सूचना नुसार १० ऑक्टोबर पर्यंत ई केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे .त्यामुळे प्रलंबित शेतकऱ्यांना  ई केवायसी पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे  परंतु सदर मुद्दत संपल्यावरती