कासेवाडी गावचे सुपुत्र अमेरिकेतील उद्योगपती रमेश वाजे यांना मातृ शोक तळा संजय रिकामे तळा तालुक्यातील कासेवाडी गावचे सुपुत्र अमेरिकेतील उद्योगपती रमेश वाजे यांच्या मातोश्री रुक्मिणी सखाराम वाजे यांचे शुक्रवारी १७.११.२३ रोजी दुपारी तीनच्या सुमारास दीर्घ आजाराने कांदिवली येथील निवासस्थानी निधन झाले त्या ७८ वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे.रमेश वाजे यांचे धाकटे बंधू राजू वाजे यांचे २ महिन्यांपूर्वी अकस्मात निधन झाले होते आता त्यांच्या मातोश्री यांचे निधन झाल्यामुळे वाजे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. कै .रुक्मिणी वाजे अत्यंत प्रेमळ मनमिळाऊ व्यक्तिमत्व होते. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले.माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. तीच आमच्या सर्वांचा आधार होती. मी माझ्या व्यवसायाच्या निमित्त अमेरिकेमध्ये असल्याने चार मुलांची जबाबदारी आईने यशस्वीपणे पार पाडली.माझी आई कडक शिस्तीची आणि प्रेमळ स्वभावाची होती तीने चा
Posts
Showing posts from November, 2023
- Get link
- Other Apps
तळा शहरातून महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक डीपीची काॅईल चोरीला तळा संजय रिकामे तळा शहरात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. दिनांक १९/११/२०२३ रोजी रात्रीच्या सुमारास चोरटयांनी चक्क महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक डीपी वर डल्ला मारला आहे. मुख्य म्हणजे इलेक्ट्रॉनिक डीपी तळा रोहा रस्त्यालगत राममंदिर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेलाच आहे. इतक्या मुख्य रस्त्यालगत डीपीची चोरी होणे ही अतिशय धक्कादायक बाब आहे. डीपी चालू स्थितीत असताना मुख्य प्रवाह बंद करून त्याच्या आतील धातुच्या तारा चोरटयांनी लंपास केल्या आहेत. जुना डीपी खराब झाल्याने त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच हा नवीन इलेक्ट्रॉनिक डीपी बसविण्यात आला होता अशा प्रकारच्या डीपी चोरीमुळे पोलिस यंत्रणेला अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वी तळा तालुक्यातील टोकार्डे येथून देखील पाणी योजनेची विद्युत केबल चोरीला गेली होती. निर्जन ठिकाणी लावलेली इलेक्ट्रॉनिक डीपी चोरट्यांसाठी सॉफ्ट कॉर्नर ठरतात.डिपीमध्ये शेकडो लिटर ऑईल अस
- Get link
- Other Apps
रोठ बुद्रुक शिवसेना वतीने स्व.बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली. खारी /रोहा ( केशव म्हस्के) हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या स्मूर्ती दिनानिमित्ताने रोठ बुद्रुक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या स्मूर्ती दिनानिमित्ताने आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी रोठ बुद्रुक सरपंच नितीन वारंगे,शाखा प्रमुख निलेश वारंगे,महिला आघाडी प्रमुख अमृता शशिकांत साळुंके,शिवसैनिक शशिकांत साळुंके,जयेश माने,अनिष शिंदे सह धाटाव विभागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छायाचित्र :- केशव म्हस्के (खारी/रोहा)
- Get link
- Other Apps
खासदार सुनिल तटकरे साहेबांनी खारगाव ग्रामपंचायतीचे थेट सरपंच दत्तात्रेय काळे यांचे केले अभिनंदन खारी- केशव म्हस्के कोकणचे विकास पुरुष रायगड लोकसभा सदस्य लोकप्रिय खा.सुनिल तटकरे साहेबांनी खारगाव ग्रा.पं.चे थेट सरपंच दत्तात्रेय चिमाजी काळे आणि नवनिर्वाचित उपसरपंच रामदास रामचंद्र दळवी यांचे अभिनंदन करून पुढील उज्वल वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील,रायगड जिल्हा सरचिटणीस विजय मोरे,रोहा तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर,सर्व ग्रा.पं.सदस्य व महिला सदस्या वर्ग यांसह रमाकांत पाटील,बबन वारगुडे,अवधूत मातेरे, समीर म्हस्के आदिंसह खारी - खारगाव हद्दीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते... छायाचित्र :- केशव म्हस्के (खारी/रोहा)
- Get link
- Other Apps
धामणसई पंचक्रोशीतील जेष्ठ वारकरी गुरुवर्य ह.भ.प.सखाराम महाराज निकम (भाऊ महाराज) पंचतत्वात विलीन... खारी-रोहा,दि.१६(केशव म्हस्के) रोहे तालुक्यातील धामणसई गावचे सोनगाव - गावठाण धामणसई पंचक्रोशीतील जेष्ठ वारकरी ऋषितुल्य व्यक्तिमत्व तथा गुरूवर्य ह.भ.प.सखाराम महाराज निकम (भाऊ महाराज) यांना बुध.दि.१५ नोव्हे.रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने वयाच्या ९० व्या वर्षी देवाज्ञा वैकुंठवास... वै.गुरूवर्य अलिबागकर बाबा यांच्याकडून वारकरी संप्रदायाची दीक्षा घेऊन भाऊ महाराजांनी धामणसई पंचक्रोशीत वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली.आणि आज पंचक्रोशीत सांप्रदायाचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे.भाऊ महाराजांनी आपल्या आयुष्यात सर्वच गोष्टींचा त्याग करून परमार्थ करून समाजप्रबोधनाचे मोठे कार्य केले.त्यांच्या वैकुंठ गमनाने धामणसई पंचक्रोशी पोरकी झाली असून सांप्रदायामध्ये कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना समाजमनातून व्यक्त होऊ लागली आहे.त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेल्या सर्व भाविकांना शोक अनावर झाला होता.तर ज्ञानोबा-तुकाराम व विठ्ठल नामाच्या गजरात त्यांची अंत्ययात्रा काढून
- Get link
- Other Apps
आदर्श सेवा मुंबईकर मंडळ सोनसडे चे वतीने दिपावली निमित्ताने फराळ वाटप! तळा कृष्णा भोसले. तळा तालुक्यातील सोनसडे येथील चाकरमानी असलेल्या मुंबई मध्ये नोकरी निमित्ताने गेलेल्या परंतु आपल्या मातृभूमी शी नाळ जोडलेल्या आदर्श सेवा मुंबई कर मंडळ सोनसडे यांचे वतीने गावातील बंधूभगिनिना दिपावली निमित्ताने फराळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष देवजी गावडे, कार्याध्यक्ष परशुराम वरंडे, सचिव पत्रकार कृष्णा भोसले,उपाध्यक्ष , उपसचिव शंकर रसाळ, खजिनदार नथुराम ताम्हणकर, पांडुरंग रसाळ, सल्लागार रामचंद्र घाडगे जेष्ठ सल्लागार बाळोजी वंरडे, यशवंत शिगवण, पांडुरंग भोसले,रविंद पाटेकर आणि महिला मंडळ सोनसडे, मुंबई कमेटीचे अध्यक्ष संतोष पवार, उपाध्यक्ष नामदेव वनगुले, खजिनदार योगेंद्र भोसले, सदस्य, इतर मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर तळा तालुका कुणबी युवा अध्यक्ष विजय घाडगे, राजु थिटेकर, सुनिल बैकर,देविदास बांद्रे, मंगेश मांडवकर, व इतर सदस्य ही उपस्थित होते. यावेळी दिपावली च्या शुभेच्छा देत फराळाचा वाटप करण्यात आला. सर्वाना शुभेच्छा देत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
- Get link
- Other Apps
तळा तालुक्यातील शेतकरयांची दिवाळी अंधारातच - कैलास पायगुडे तळा प्रतिनिधी - कृष्णा भोसले. तळा तालुक्यातील शेतकरयानां यावर्षी आंबा काजु पिकविमा नोव्हेंबर महिना संपत आला तरी मिळाले नाही. एकमेव पिक घेत असलेला हा तालुका आजही या अनुदानापासून वंचित आहे. त्यामुळे शेतकरयांची दिवाळी अंधारात गेली असे म्हणायला हरकत नाही. असे आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना सामाजिक कार्यकर्ते कैलास पायगुडे यांनी सांगितले. देशात राज्यात शेतकरी बांधवाना पिक विमा मिळाला त्यांच्या घरी दिवाळी झाली माझ्या तळा तालुक्यातील गरीब डोंगरकपारीत राहतो.त्याला मात्र दिवाळीच्या सणात हे पिक विम्याचे पैसे पदरी पडले नाहीत. त्यामुळे शेतकरी वर्ग खुप नाराज झाला आहे. अशा या तालुक्यात कृषी, महसूल विभागाचे अधिकारी यांचा पाठपुरावा करतात की नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अनेक जिल्ह्यातील आंबा काजु बागायती शेतकरयानां शेतकरी हप्ता हा कमी आहे. परंतु इथे जास्त विमा हप्ता असुनही शेतकरी वेळेत भरतात मग आमचे पैसे परत मिळायला मुदत असते की नसते असा प्रश्न त्यांनी केला आहे. यावर्षी चा हप्ता भरण्यासाठी ३० नोव्हेंबर ही शेवटची तारीख
- Get link
- Other Apps
मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा, ला दोन सुवर्ण पदके आणि तीन रौप्य पदके प्राप्त तळा प्रतिनिधी कृष्णा भोसले. मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा दिनांक 8/11/2023 रोजी J.S.M महाविद्यालय अलिबाग येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या कुस्ती स्पर्धेमध्ये द.ग.तटकरे महाविद्यालयाने 2 सुवर्ण पदके आणि 3 रौप्य पदके प्राप्त केली. तसेच 4 खेळाडूंची मुंबई विद्यापीठ आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये द.ग.तटकरे महाविद्यालयातील कु. हिमांशू यादव ( FYBA ) 61 किलो वजनीगट आणि कु. साहिल चोरगे ( SYBcom) 79 किलो वजनीगटातुन सुवर्णपदके मिळविले. तसेच कु. सुनील मल्लाह ( TYBcom ) 61 किलो वजनीगट , कु. अशिष तळेकर ( SYBA ) 74 किलो वजनीगट आणि कु. अनिकेत यादव (SYBcom) 83 किलो वजनीगटातून यांनी रौप्य पदके मिळविले तसेच यातील 4 खेळाडूंची कु. हिमांशू यादव , कु. सुनील मल्लाह , कु. साहिल चोरगे, कु. अनिकेत यादव यांची मुंबई विद्यापीठ आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थ
- Get link
- Other Apps
" माझे कुटुंब माझी पेन्शन "मागणीसाठी तळा तहसीलदार कार्यालयात कर्मचारी आंदोलन तळा-किशोर पितळे आज दि. ०८/११/२०२३ रोजी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने जुनी पेन्शन लागू करावी या मुख्य मागणीसह इतर १५ प्रलंबित मागण्यांसाठी सहकुटुंब मोर्चाचे आयोजन केले होते. हा मोर्चा तळा शहर बाजारपेठ तहसील कार्यालयापर्यंत असा काढण्यात आला.आपल्या प्रमुख मागण्यांसाठी दि.१४ मार्च २०२३ ते २० मार्च २०२३ ह्या कालावधीत संप पुकारण्यात आला होता. त्यावेळी सरकारने दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून हा संप २० मार्च ,२०२३ रोजी मागे घेण्यात आला होता.परंतु आज सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही सरकारने आपली आश्वासने पाळली नाहीत. म्हणून हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. सरकारने,संघटनेने मांडलेल्या मागण्या तात्काळ पूर्ण न केल्यास राज्यभरातील सरकारी कर्मचारी व शिक्षक व शिक्षकेतर, जि.प. व निमसरकारी व कंत्राटी कर्मचारी १४ डिसें.२०२३ पासून बेमुदत संपावर जातील.असा इशारा आज जमलेल्या सहकुटुंब जमावा समोर करण्यात आला आहे.नवीन पेन्शन योजनेप्रमाणे गेली १७ वर्षे राज्यातील कर्मचारी शिक्षक नाडले गेले आहेत. सेवानिवृतीन
- Get link
- Other Apps
अलिबाग येथे गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी ओबीसी जनमोर्चा सभेचे आयोजन बहुसंख्य पदाधिकारी व समाज बांधवांनी उपस्थित रहावे -सुरेशजी मगर रोहा. दि 7 नोव्हेंबर - शरद जाधव महाराष्ट्रात सर्वत्र मराठा आरक्षणाचे आंदोलन चालू आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाज ओबीसी प्रवर्गात येण्यासाठी प्रयत्न करत आहे. आधीच ओबीसी प्रवर्गात असलेल्या साडेतीनशे पेक्षा जास्त जातींना २७ टक्के आरक्षण दिले गेले आहे. या सत्तावीस टक्के आरक्षणापैकी काही जिल्ह्यात १९ टक्के काही जिल्ह्यात त्या खालोखाल आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आधीच ओबीसी प्रवर्ग ५२ टक्के पेक्षा जास्त असताना आरक्षण त्यामानाने कमी आहे. असे असताना मराठा समाज जर ओबीसी प्रवर्गात आला तर या आरक्षणात मराठा समाज ओबीसीचे आरक्षण गिळंकृत करेल एवढे निश्चित या करिता ओबीसी समाज बांधवांनी जागृत रहाणे गरजेचे आहे. अलिबाग येथे गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता ओबीसी जन मोर्चा संघटनेच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे सदर सभेस मार्गदर्शन करण्यासाठी चंद्रकांतजी बावकर - कार्याध्यक्ष ओबीसी जनमोर्चा श्री अरविंदजी डाफळे- सरचिटणीस ओबीसी जनम
- Get link
- Other Apps
खारगाव ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी चे थेट सरपंच दत्तात्रेय काळे यांची सर्वाधिक मताधिक्याने निवड.. राष्ट्रवादी सरपंच सहित ६, शिवसेना (शिंदे गट) २, शेकाप १ आणि अपक्ष १. खारी /रोहा (केशव म्हस्के)०७ नोव्हें:- रविवार दि.५ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या १२ ग्राम पंचायतींच्या निकाल हाती येताच राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची व तालुक्यातील बहुचर्चित खारगाव ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे थेट सरपंच म्हणून दत्तात्रेय चिमाजी काळे यांच्या रूपाने सर्वाधिक मताधिक्य मिळवून विजयी संपादित करीत खारगाव ग्राम पंचायतीवर पुन्हा राष्ट्रवादीचे( सरपंच पदाचे) वर्चस्व प्रस्थापित करत गड अबाधित ठेवण्यात मोठे यश मिळविले आहे.. तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची मानलेली खारगाव ग्रूप ग्राम पंचायत म्हणजे खारी - काजुवाडी गुरूनगर,गौळवाडी तारेघर ही महत्वाची गावे आदिवासी वाड्या वस्त्या या प्रामुख्याने रोहा माणगाव - श्रीवर्धन विधान सभा मतदार संघामध्ये येतात तर मौजे खारगाव हद्दीतील गावे आदिवासी वाड्या वस्त्या या मुरुड - अलिबाग विधान सभा मतदार संघामध्ये विभागल्याने
- Get link
- Other Apps
म्हसळ्यात 12 पैकी 10 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा नेवरूळ व भेकऱ्याचा कोंड ग्रामपंचायतीत ग्रामविकास आघाडी विरोधी पक्षांवर राष्ट्रवादीचा एकतर्फी दबदबा म्हसळा तालुका ग्रामपंचायत निवडणुकीत खासदार सुनिल तटकरे यांच्या विकास कामांना जनतेचा कौल म्हसळा - श्रीकांत बिरवाडकर म्हसळा तालुक्यात 12 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकित ग्रामपंचायत मधील नागरिकांनी खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या विकास कामांना प्राधान्य देत त्यांचे हात मजबुत केले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकित म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम राहिली असल्याने हि लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची नांदी असल्याचे बोलले जात आहे.12 पैकी बिनविरोध निवडून आलेल्या 7 ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते तर दोन ठिकाणी ग्रामविकास आघाडीचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. तर 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानातून व 6 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालाचे मतपेटीतून ज्या तीन ग्रामपंचायत मधे निवडणूक लागली होती त्या तीनही ठिकाणी राष्ट्र
- Get link
- Other Apps
भातसई ग्रामपंचायतीचा धक्कादायक निकाल ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला हवा शिंदे गटाची विजय मात्र राष्ट्रवादीचा. शेकाप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची राजकीय खेळी पावरफुल ठरल्याची चर्चा रोहा - (शरद जाधव) रोहा तालुक्यातील बारा ग्रामपंचायत निवडणुकाचा निकाल 6 नोव्हेंबर रोजी लागला. यामध्ये संमिश्र निकाल प्राप्त झाला. बहुचर्चित व सर्वांचे लक्ष लागून असलेल्या भातसई ग्रामपंचायत मध्ये चर्चा व हवा शिंदे गटाची होती. मात्र विजय राष्ट्रवादीचा झाल्याने राष्ट्रवादी पक्षाने या ठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा केला. भातसई ग्रामपंचायत मध्ये झोळांबे, लक्ष्मीनगर, वरवडे, व पाले, या गावचा समावेश आहे. या ग्रामपंचायत मध्ये जवळपास 2400 मतदान आहे. पूर्वीपासून प्रभाकर पाटील, दत्ता पाटील यांच्या काळापासून या ग्रामपंचायतींमधे शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे. मात्र पाटलांची पुढची पिढी कमी पडली आता नवीन पिढी पुढे आल्याने राजकारण बदलले .निवडणुकीच्या सहा महिन्यापूर्वीच भातसई गावच्या विद्यमान सरपंचाने आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेच्या आशा पल्लव
- Get link
- Other Apps
तळ्यात पाच ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा,ठाकरे गटाने खाते उघडले,शिंदे गट व भाजपला भोपळा तळा -संजय रिकामे तळा तालुक्यात भानंग, तळेगाव, मांदाड, गिरणे, निगुडशेत, चरई खुर्द अशा सहा ग्रामपंचायतींचा निकाल आज घोषित झाला. या निवडणुकीत पाच ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून ठाकरे गटाने खाते उघडले आहे तर शिंदे गट व भाजपला भोपळा मिळाला आहे.यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात प्रथमच उध्दव ठाकरे गटाचे खाते उघडले आहे. तळा तालुका प्रमुख नाना दळवी यांनी भानंग ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवला आहे.शिवसेना पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचे हा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे, शिंदे गटातील बंडानंतर शिवेसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली असताना तळा तालुक्यातून शिवसेनेसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे.भानंग ग्रामपंचायतीत थेट सरपंच पदासाठी उद्धव ठाकरे गटाचा विजय झाला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार करण वंदना रामा यांनी शिंदे गटाच्या उमेदवार भऊड सुहानी सुनील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार वाजे साक्षी गोविंद यांचा मोठ्या मतांनी पराभव केला.करण वंदना रामा यांना ५६५,भऊड सुहा
- Get link
- Other Apps
रोहा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीकरीता उद्या निवडणूक आमदार खासदारांनी निवडणुका केल्या प्रतिष्ठेच्या अनेक ठिकाणी काटे की टक्कर रोहा दि.4 नोहोंबर (शरद जाधव) रोहा तालुक्यामध्ये उद्या दिनांक ५ नोव्हेंबर रोजी १२ ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून स्थानिक गावचे राजकारणात सुद्धा खासदार, आमदार यांनी सहभाग घेतल्याने आपल्या अस्तित्वासाठी आमदार खासदारांनी निवडणूका प्रतिष्ठेच्या केल्याचे निवडणुक प्रचारावरून दिसून आले. महाराष्ट्राच्या राजकारणातले बदलते राजकीय स्थित्यंतरे यामुळे स्थानिक मतदार कार्यकर्त्यांनी सुद्धा अनेक ग्रामपंचायतीमध्ये नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून आले. गावागावात एकमेकाशी पंगा घेणे टाळले. काही ठिकाणी शिंदे गट राष्ट्रवादी युती, शेकाप शिंदे गट युती ,तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढत आहेत तरी सुद्धा रोहा म्हटले की राजकारण असणारच. आणि त्यातच रोह्याला आम. महेंद्र दळवी, आम. रवीशेठ पाटील माजी आम. धैर्यशील पाटील खा. सुनील तटकरे, आ. अनिकेत तटकरे, मंत्री आदिती तटकरे आमदार जयंत पाटील, पंडित पाटील यांचा विधानसभा मतदारसंघाचा भाग येत असल्यान
- Get link
- Other Apps
भातसई ग्रामपंचायतीत थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत योगिता पारधी विजयी होणार राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा दावा रोहा (शरद जाधव) रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत भातसई मध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या थेट सरपंच पदाच्या उमेदवार सौ योगिता नामदेव पारधी या विजयी होणार असा दावा राष्ट्रवादी कार्यकर्ते करीत आहे. सौ योगिता नामदेव पारधी या उच्चशिक्षित आहेत. बी.एड.चे शिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्या सरपंच पदाला निश्चितच न्याय देतील. राष्ट्रवादी पक्षाने एक उच्चशिक्षित उमेदवार रिंगणात उभे केल्याने राष्ट्रवादी पक्षाची जमेची बाजू ठरत आहे. त्यामुळे योगिता पारधी या सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी होतील असा दावा राष्ट्रवादी कार्यकर्ते करीत आहेत. रोहा तालुक्यातील भातसई ग्रामपंचायत ही अलिबाग मतदारसंघात येत आहे या ठिकाणी शिवसेनेचे महेंद्र दळवी हे विद्यमान आमदार आहेत गेली अनेक वर्ष भातसई ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आहे. परंतु काही दिवसापूर्वी येथील शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच गणेश खरविले यांनी शेकापला अखेरचा लाल सलाम करीत महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश क
- Get link
- Other Apps
खारी येथे ग्रामपंचायतीचे बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचे आमदार अनिकेत तटकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन खारी -केशव म्हस्के कार्यसम्राट आमदार अनिकेत भाई तटकरे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर,सरपंच पदाचे उमेदवार दत्तात्रेय काळे यांच्या हस्ते खारगाव ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक दरम्यान प्रभाग क्र.४ मधील रोहिणी रोहिदास शिर्के,रामदास रामचंद्र दळवी, राजेंद्री बबन वारगुडे,आणि प्रभाग क्र.१ चे नयना नवनीत सावंत, चिमा आत्माराम ढुमणे हे ५ ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार सदस्यांचे पुष्प गुच्छ देत सन्मान पूर्वक गौरविण्यात आले असून अभिनंदन करून पुढील उज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.. छायाचित्र :- केशव म्हस्के खारी/रोहा)
- Get link
- Other Apps
जरांगे पाटील यांच्या समाज लढ्याला पाठिंबा देण्यासाठी शेणवई ग्रामस्थांनी संपूर्ण गावातून काढली शांतता रॅली रोहा प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण या मागणीसाठी जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला समर्थन देण्यासाठी तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी रोह्यामध्ये मराठा आंदोलकांचे साखळी उपोषण सुरू आहे. रोहा तालुक्यातील शेणवई ग्रामस्थांनी साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शविला.मनोज जरांगे यांच्या समाज लढ्याला पाठिंबा देण्यासाठी कर्तव्य म्हणून ग्रामस्थांच्या वतीने श्री नवनाथ मंदिर पासून संपूर्ण गावातून रॅली काढण्यात आली. ग्रामदैवत सोमजाई मंदिर येथे रॅलीची सांगता केली. महिला, ग्रामस्थ यांनी घोषणा देत आपली मतं देखील व्यक्त केली.या रॅलीमध्ये तरूण, ग्रामस्थ, विशेष म्हणजे महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उद्योजक सुभाषजी देशमुख, उद्योजक महेंद्र पार्टे, सरपंच डाॅ.प्रगती हेंमत देशमुख, शुभम राजेशिर्के, उदयजी देशमुख,विक्रांत देशमुख,अरुण शिर्के,सुबोध देशमुख, निलेश देशमुख, नितीन देशमुख, तुषार देशमुख,अमोल देशमुख, अन
- Get link
- Other Apps
आ.अनिकेत तटकरे यांच्या उपस्थिती मध्ये खारी येथे राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ. खारगाव ग्रा.पं मध्ये पाच बिनविरोध उमेदवार काढण्यात राष्ट्रवादी पक्षास मोठे यश.. रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर हस्ते नारळ फुटला... खारी/रोहा (केशव म्हस्के) रोहा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या खारगाव ग्रूप ग्राम पंचायत हद्दीतील खारी येथील हनुमान मंदिर सभागृह येथे विधान परिषद सदस्य आमदार अनिकेत तटकरे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचे नारळ फोडले... राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे थेट सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार दत्तात्रेय चिमाजी काळे सदस्य प्रभाग क्र.१ चे संदेश झिलू लांबोरे,प्रभाग क्रमांक २ चे रमाकांत एकनाथ पाटील,रुचिता अविनाश धसाडे,प्रभाग क्रमांक ३ चे सतेज चंद्रकांत आपणकर, आशा अशोक मातेरे,विमल मंगेश जगताप तर यावेळी प्रभाग क्र.४ मधील रोहिणी रोहिदास शिर्के,रामदास रामचंद्र दळवी, राजेंद्री बबन वारगुडे,आणि प्रभाग क्र.१ चे नयना नवनीत साव
- Get link
- Other Apps
रोह्यात मराठा आरक्षण उपोषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद रोहा -शरद जाधव गेली अनेक वर्ष सातत्याने आम्हाला हक्काचा आरक्षण द्या म्हणत मराठा समाज शासन दरबारी लढत असताना ढिम्म सरकार लक्ष देत नसल्याने लढवय्या मराठा मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषणाचे हत्यार उपसत लडो या मरो भूमिका घेत शासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रोह्यात सकळ मराठा समाजाने शासनाचे लक्ष वेधण्याकरता तीन दिवस साखळी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.यास संपूर्ण रोहा तालुक्यातील मराठा बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नगरपालिकेच्या समोर एक भव्य स्टेज उभे करून कार्यकर्ते उपोषण बसलेले आहेत या ठिकाणी समाज प्रबोधनात्मक गिते व भाषणे सुद्धा होत आहेत. रोहा तालुक्यात सुद्धा मराठा समाज मोठ्या संख्येने आहे. विविध पक्षात सामाजिक संघटनेत गावोगावी ताकदीचे नेते आहेत. त्या सर्व नेत्यांनी आज समाजातील भावी पिढीच्या भविष्यासाठी आरक्षणात भाग घेतला आहे.सदर मराठा आरक्षण साखळी उपोषणास समाज नेते व्ही टी देशमुख, सकळ मराठा समाज अध्यक्ष आप्पा देशमुख, विजयराव मोरे, विनोद पाशिलकर समीर शेडगे, नितीन परब, राजेश काफरे, म
- Get link
- Other Apps
कोमसाप शाखा रोहा तर्फे "कवितांचे चांदणे" हे जिल्हास्तरीय निमंत्रित कवींचे काव्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न रोहा प्रतिनिधी दि. २९ -१०-२०२३ रोजी कोमसाप शाखा रोहा तर्फे कवितांचे चांदणे हे जिल्हास्तरीय निमंत्रित कवींचे काव्य संमेलन पार पडले.. रोहे शहराच्या जेष्ठ नागरीक सभागृहात या कार्यक्रमाचे अगदी दिमाखदार आयोजन करण्यात आले होते . असे कोमसाप रोहा शाखेच्या अध्यक्षा सौ संध्या दिवकर यांनी सांगितले . चांदण्या तारे नभीचे आज आले पाहुणे अंगणी बरसून गेले कवितांचे चांदणे सुधीर शेठ यांच्या अध्यक्षते खाली हे संमेलन अतिशय उत्साहात पार पडले . काव्यसंमेलन व गजलमुशायरा असा हा संलग्न कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच रोहा कोमसाप रोहा शाखेचे सर्व सदस्य, मान्यवर निमंत्रित प्रमुख पाहुणे कोकण मराठी साहीत्य परिषदेचे रायगड जिल्हयाचे शाखाध्यक्ष आदरणीय सुधीर शेठ, महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ सदस्य आदरणीय एल बी पाटील, जिल्हा समन्वयक अ.वि. जंगम, मुरुड शाखेचे अध्यक्ष मा संजय गुंजाळ महाराष्ट्राच्या जेष्ठ गझलकारा ज्योत्स्ना रजपूत गडकिल्ले अभ्यासक, लेखक श्री सुखदजी राणे तसेच को