शेतकऱ्यांनी गिरवले सेंद्रिय शेतीचे धडे, तळा कृषी विभागामार्फत प्रशिक्षणाचे आयोजन तळा कृष्णा भोसले तळा तालुक्यातील खांबवली येथे शेतकऱ्यांना डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी सेंद्रिय शेती कार्यशाळचे आयोजन कृषी विभाग व आत्मा तळा यांचे मार्फत करण्यात आले होते. सदर कार्यशाळेस गावचे सरपंच निकिता गायकवाड ,उपसरपंच छाया कसबले, पोलीस पाटील नारायण गायकवाड , मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव,कृषी साहाय्यक दिनेश चांदोरकर आत्मा बीटीएम सचिन लोखंडे गाव अध्यक्ष व सेंद्रिय गटातील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस आत्मा बीटीएम सचिन लोखंडे यांनी डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत सेंद्रिय पद्धत संकल्पना व उद्देश या विषयी विस्तृतपणे माहिती दिली या नंतर मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची कारणमिमांसा करताना सांगितले की, मोठ्या प्रमाणात होत असलेला रासायनिक खतांचा आणि कीटकनाशके इत्यादींचा वापर यामुळे मानवी आरोग्याला धोका तसेच जमिनीचे आरोग्य सुद्धा धोकादायक होत गेल्याने शासन सेंद्रिय शेतीकडे वळत आहे. कुठल्याही प्
Posts
Showing posts from January, 2024
- Get link
- Other Apps
आदर्श वाली ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न रोहा प्रतिनिधी आदर्श वाली ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 26 जानेवारी रोजी सकाळी ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर अकरा वाजता हळदी कुंकू कार्यक्रम सौ.वरदा सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला. या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आदर्श ग्रुप ग्रामपंचायत वालीचे सरपंच श्री उद्देश जनार्दन देवघरकर यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये महिलांना व्यवसायासाठी साहित्य वाटप, प्राथमिक शाळा वाली येथे साहित्य वाटप, अंगणवाडीसाठी साहित्य वाटप, टेबल, खुर्ची, फिल्टर वाटप,ओला सुका कचरा व्यवस्थापन करण्यासाठी डस्टबिन वाटप करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आदर्श वाली ग्रामपंचायतचे सरपंच उद्देश देवघरकर यांनी उपयोगी अशा वस्तूंचे वाटप केले. सर्व महिला वर्गाकडून तसेच शाळा व्यवस्थापनाकडून अशा सर्व स्तरातून त्यांचे कौतुकव आभार मानले. सौ.वरदा तटकरे यांच्या हस्ते सर्व वस्तूंचे वाटप करण्या
- Get link
- Other Apps
इमारत नुतनीकरणांने एक चांगले स्थित्यंतर घडले आहे, पोलिस अधिक्षक-सोमनाथ घार्गे तळा-किशोर पितळे श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाचे नुतनीकरण उद्घाटन जिल्हा पोलिस अधिक्षक मा.सोमनाथ घार्गे यांच्या शुभहस्ते २३ जाने.२४ रोजी सकाळी ११.३० वा. करण्यात आले.यावेळी व्यासपिठावर समाजसेवक तथा रायगड भुषण कृष्णा महाडीक चेअरमन यशवंत मोंढे, संस्था अध्यक्ष दिपक रसाळ,मुख्याध्यापिका श्रीम. किरण चव्हाण प्रसिध्द उद्योजक मंदार शर्मा सचीव मनोहर काप,उप विभागीय पोलीस अधिकारी नितीन पोंदकुळे, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) सुनिता पालकर उपस्थित होते. यावेळी उद्घाटनपर भाषणात संबोधित करताना म्हणाले कि डाॅ. आंबेडकर म्हणतात शिक्षण घ्या संघटीत रहा संघर्ष करा,मोठे व्हा.संघर्ष वाईट गोष्टींचा करा.शिक्षणाने प्रगती होते. विद्यार्थांनी पुढील धेय्य निश्चित करा. पालकांनी मुलांचे मनोबल खचू देवू नका.वेगवेगळ्या क्षेत्रात नावीन्य मिळू शकते. संघर्ष वाईट गोष्टीसाठी करा. ज्या शाळेने घडवले मोठे केले तिला विसरू नका. माझ्या सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत शिकलो शिक्षण घेतले मोठा झालो. गावी गेलो का आव
- Get link
- Other Apps
सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड अंतर्गत वरसे येथे "सुसंवाद प्रशिक्षण कार्यशाळा" संपन्न रोहा प्रतिनिधी मंगळवार दि.23.01.2024 रोजी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड अंतर्गत CSR Head सौ.माधुरी सणस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान ,पंचायत समिती रोहा यांच्या सहकार्यातून वरसे या ठिकाणी रोहा तालुक्यातील सर्व CRP , महिला बचत गटाचे अध्यक्ष, सचिव, सदस्य यांच्यासाठी "सुसंवाद प्रशिक्षण कार्यशाळा" हा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रम दरम्यान लेखक, सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते, व्यसनमुक्ती प्रेरणा संवर्धन तज्ञ श्री.किशोर काळोखे यांनी समजुतदार, सहनशीलता, सुसंवाद ,समुदाय संवाद,ताणतणाव मुक्त या विषयी मार्गदर्शन केले.तसेच सदर कार्यक्रमास रोहा तालुक्यातील सर्व CRP व महिला बचत गट,प्रभाग संघ,ग्रामसंघ चे अध्यक्ष, सचिव आणि सदस्य असे एकुण 110 महीला उपस्थिती होत्या. दरम्यान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान ,रोहा पंचायत समिती चे पदाधिकारी श्री.अक्षय खंदारे ,श्री.रविंद्र राठोड,नेहा पाटील मॅडम तसेच सुदर्
- Get link
- Other Apps
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तळा येथे भव्य शोभायात्रा तळा-किशोर पितळे अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यासह तळा शहरात श्रीराम प्राण प्रतिष्ठापना निमित्ताने भव्यशोभा यात्रेचे सकल हिंदू समाज संघटनेने आयोजन करण्यात आले होते. या शोभा यात्रेेत तळा प्राथमिक मुलांची शाळेतील विद्यार्थ्यांनी व तळा हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी श्रीराम लक्ष्मण सीता हनुमानाची व शबरीची विविध वेशभूषा करून श्री राम पंचायतन अवतरल्याचे नयनरम्य दृष्य विषेश आकर्षण ठरून शहरातील सर्वांचे लक्ष वेधले.जवळ जवळ पाचशे वर्षांनी आयोध्या येथे मूळ स्थानी श्रीरामाची बालमूर्ती प्राणप्रतिष्ठा होत असल्याने संपूर्ण देशात सर्वत्र शोभा यात्रा काढण्यात आल्या. श्री राम वेशभूषा, घरोघरी श्रीराम ध्वज, पताका, लाइटिंग ठीक ठिकाणी रांगोळी,स्वच्छता, रंगरंगोटी काढून एक नवचैतन्य भक्तीमय वातावरण निर्माण झालेहोते. सायं. ४ वा शोभा यात्रा मधली ब्राह्मण आळी, मारुती मंदिर येथून काढून बळीचा नाका,एस टी स्टॅन्ड, नगरप
- Get link
- Other Apps
कु.परमेश्वरी (परी) वेदक जर्मन लिपीत देशात पहिली.गो.म.वेदक तळा हायस्कूलचे नांव उंचावले तळा-किशोर पितळे तळा तालुक्यातील गो.म.वेदक विद्यामंदिर ची विद्यार्थीनी कु. परमेश्वरी (परी)प्रशांत वेदक हि इ.९वीत शिक्षण घेणारी असून इयत्ता ८वी त असताना जर्मन लेव्हल २ फाॅरेन लॅग्वेज ऑनलाईन परीक्षा डिसेंबर २०२२मध्ये घेण्यात आली. या परिक्षेचा निकाल लागला तेव्हा जिल्ह्यात प्रथम, राज्यात तिसरा तर देशात चौथ्या क्रमाकांने उत्तीर्ण होऊ त्या परीक्षेत ५० पैकी ४५ मार्क मिळवले होते. या यशामागे सातत्याने शिकण्याची जिद्द धरली होती ऑन लाईन ट्युशन काॅरस्पाडींग करून यश मिळवले आहे. यंदा जर्मन भाषा लेव्हल १ व जर्मन भाषा लेव्हल २ हि आणि यंदा फाॅरेन लॅग्वेज ऑनलाईन ऍक्सझाम नं.३मध्ये ५० मिळवून यशस्वीरित्या पास झाली असून जिल्हा,राज्य,व देश पातळीवर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन शाळेचे,गावाचे नांव, घराण्याचे नांव उंचावले असल्याने तिचे सर्व स्तरावरुन अभिनंदन केले जात आहे.कु.परी शाळेत पहिल्या क्रमांकावर असून प्रेमळ,नम्र,मेहनती अशी असून कोणतेही क्लास न घेता स्वत: अभ्यास करुन मेहनतीवर यश संपादन केले आहे.सुवर्णपदक प
- Get link
- Other Apps
नवनियुक्त सहा.पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे तळा प्रेस कडून स्वागत तळा -किशोर पितळे तळा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची २ जाने. २४ रोजी तळा येथे नियुक्ती झाली आहे. कैलास डोंगरे यांची बदली झाल्यामुळे गणेश कराड यांची खालापूर पोलीस ठाण्यातून सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. गणेश कराड सन २०१० च्या बॅचचे सहा.पोलिस निरीक्षक पदी दंगल नक्षलवादी भागातील गडचिरोली जिल्ह्यात झाली. त्यावेळी त्यांनी ३ वर्षात अनेक गुन्हेगार त्याच बरोबर नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.त्यांचे उत्कृष्ट कामगिरी बद्दल तत्कालीन गृहमंत्री कै.आर आर पाटील यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आलं होतं. त्यानंतर नवी मुंबई रायगड खोपोली खालापूर येथे काम केले आहे गणेश खराडे यांनी पदभार स्वीकारल्या नंतर तळा प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करून पुढील काळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी पत्रकारांशी संवाद करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी पदभार स्वीकारताच बंद घरातील घर फोडीतील आरोपीला अवघ्या २४ तासात मुंबईतून पकडून अटक केली. तळा
- Get link
- Other Apps
ढगाळ वातावरणात आंबा पिकाची घ्या काळजी-आनंद कांबळे तळा - कृष्णा भोसले. तळा तालुक्यामध्ये आंबा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे आंबा पिकाला नोव्हेंबर महिन्यात पालवी येऊन डिसेंबर - जानेवारी महिन्यात मोहोर येण्यास सुरवात होते. मात्र चालू वर्षी पावसाचा हंगाम लांबल्यामुळे पालवी व पर्यायाने मोहोर येण्याच्या प्रक्रियेस विलंब झाला.त्यातच मोहोर फुटण्यास सुरवात झाल्यानंतर गेल्या एक दोन दिवस काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे नवीन येत असलेल्या मोहोरावर ढगाळ वातावरणामुळे तुडतुडे, फुलकिडी यांसारख्या किडी व करपा, भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करावी असे अवाहन तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी केले आहे. यासाठी तुडतुड्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी (१० तुडतुडे प्रति पालवी /मोहोर) ओलांडली असल्यास व ज्याठीकाणी पिक पालवी अवस्थेत असेल अशा ठीकाणी डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही ०९ मि.ली. प्रती १० लिटर पाणी, पिक बोंगे फुटण्याच्या अवस्थेत असल्यास लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के