Posts

Showing posts from March, 2024
Image
  तळा येथील शिमग्याची संस्कृती पंरपरा आजच्या युगात देखील कायम तळा- किशोर-पितळे         तळा येथे शिमग्याला विशेष महत्त्व आहे. ऐतिहासिक व पौराणिक धार्मिक असे महत्व असून परंपरा आधूनिक काळात देखील जपली आहे .बदलत्या काळानुसार थोडा फार बदल होत गेला आहे. ग्रामदेवता श्री चंडिका देवी फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पोर्णिमा ते रंगपंचमी पर्यंत साजरी केली जाते.श्री.चंडिका देवीचे मुळ स्थान तळगड किल्लावर मुघलांच्या साम्राज्य होते. त्या काळात सिध्दी जोहारने या देवतेला बाटवण्याचा प्रयत्न केला.व देवीने  गावाच्या बाहेर उडी घेतली ते आजचे ग्रामदेवी चंडीकेचे मंदिर आहे.त्यावेळी पुजा,अर्चा गोसावी समाज करीत असत.व नैवद्य गावात जोगवा मागून शिजवून दाखवला जात असे म्हणून या वाडीचे नाव जोगवाडी असे पडले असा इतिहास दाखवला आहे. देवीचे मुखवटे वेदक यांच्या गादीवरुन नेऊन जोगवाडी ग्रामस्थ हा उत्सव सण भक्ती भावाने, श्रध्देने साजरा करीत आहेत.जोगवाडी पोळेकर (गोसावी )ग्रामस्थ वाजत गाजत चांदीच्या पालखीतून मुख्य वतनदार देशमुख यांच्या घरातून ग्रामदेवता श्री चंडिका देवी मंदिरात नेली जाते व मुळ पाषाणाजवळ मनोभावे प्रार्थना केली ज
Image
ग्रुप ग्रामपंचायत वरसे चे सरपंच चषक धुम -धडाक्यात संपन्न-सरपंच अमित मोहिते यांचा बोलबाला...! रोहा तालुक्यातील बलाढ्य ग्रामपंचायत मधील एक मानाची स्पर्धा...!   प्रतिनिधी दीप वायडेकर           रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरसे ही सर्वात मोठी आणि बलाढ्य ग्रामपंचायत मानली जाते. तालुक्यात ही ग्रामपंचायत अतिशय मानाची अशी ग्रामपंचायत मानली जाते. या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिनांक 20 आणि 21 मार्च रोजी भव्य दिव्य अशा सरपंच चषकाचे आयोजन करण्यात आले होते.हे आयोजन सरपंच अमित मोहिते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. ग्रामपंचायतचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून या सामन्याचा शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांक 25,000 आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 15,000 आणि  आकर्षक चषक,   , तृतीय क्रमांक 10,000,आणि  आकर्षक चषक,  चतुर्थ क्रमांक 10,000आणि आकर्षक चषक तसेच मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज अशी पारितोषिक देण्यात आली .            या स्पर्धेमध्ये ग्र
Image
पर्यावरण टास्क फोर्सच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी शेतकरी नेते पाशा पटेल! विशेष प्रतिनिधी         शेतकरी नेते आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची मुख्यमंत्र्यांच्या पर्यावरण टास्क फोर्सच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे, मुंबईसह राज्यात वाढत्या वायु प्रदुषणामुळे अनेक आराेग्य विषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत आणखी अभ्यास करण्यासाठी राज्याच्या आराेग्य विभागाकडून ‘टास्क फाेर्स’ ची स्थापना करण्यात आली. हा टास्क फोर्स पृथ्वी आणि महाराष्ट्र राज्याला प्रभावित करणाऱ्या पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्यांचा प्रभाव कमी करण्याचे मार्ग शोधण्यासाठी समर्पित आहे.           महाराष्ट्राच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे आणि मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार यांची या समितीच्या सह-अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर महाराष्ट्र राज्य हवामान कृती कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.     तसेच राज्य सरकारच्या विविध संबंधित विभागांचे सचिव टास्क फोर्सच्या कार्यकारी स
Image
महिला व बालविकास विभागामार्फत महिलांकरिता साहित्य वाटप ना.अदितीताई तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन तळा-किशोर पितळे         एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अलिबाग, महिला व बालविकास विभागा मार्फत आयोजित महिलांकरिता साहित्य वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन मा.नामदार अदितीताई तटकरे महिला बालविकास मंत्री व अलिबाग -मुरुडचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते १२ मार्च रोजी करण्यात आले.सदर कार्यक्रमात आमदार महेंद्रशेठ दळवी,शिवसेना नेत्या रणरागिणी मानसी दळवी,अतीरिक्त सी.ई.ओ.सत्यजीत बडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी गिताजंली पाटील,अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.       यावेळी आम.महेंद्र दळवी यांनी महिलांकरिता स्वच्छता, आरोग्य,कुटुंब, कायदे विषयक व इतर विषयावर मार्गदर्शन केले.त्यावेळी लाभार्थी,मोठ्या प्रमाणात महिलावर्ग उपस्थित होत्या. यावेळी उपस्थीत मान्यवरांचे हस्ते अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप, लेक लाडकी योजना प्रथम हप्ता धनादेश वाटप,अंगणवाडी स्मार्ट किट वाटप तसेच महिला बचत गटांना विविध साहित्य वाटप करण्यात आले.
Image
  मेढा येथील यश पानसरे गुवाहाटीमध्ये चमकला रोहा (शैलेश गावंड)          रोहा तालुक्यातील मेढा येथील यश विकास पानसरे  त्याच्या पुणे येथील (VIT) महाविद्यालया च्या टीम एकलव्य गटाचे नेतृत्व बजावत गुवाहाटी आसाम येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), यांच्या अलचेरिंगा या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवांमधील राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( VIT ) महाविद्यालय पुणे तसेच  रायगड जिल्हा आणि मेढा आणि गावाची शान वाढवली आहे       यश हा विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( VIT ) पुणे या महाविद्यालयाचा विद्यार्थी असून शालेय अभ्यासात हुशार  आहेच तसेच इतर कला, अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावली आहे.यशने रोहा येथील स्पंदन नाट्य संस्थेच्या माध्यमातून अनेक बालनाट्य स्पर्धा तसेच नृत्य स्पर्धांमधून  तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धेत  उत्तम  अभिनय आणि नृत्यकला सादर करून अनेक पारितोषिके मिळवली आहेत.याबाबत यश चे वडील विकास पानसरे यांच्याशी संपर्क साधला असता मिळालेला माहितीनुसार ८ ते  १० मार्च दरम्यान गुवाहाटी येथे ही स्पर्धा पार पडली       अलचेरिंगा ला "अ
Image
कोलाड सारख्या मातीतून सुनील तटकरे सारखे नेतृत्व देशाला मिळाले हे सर्वांचे भाग्य- कृषिमंत्री धनंजय मुंडे कोलाड नाक्यावरुन राष्ट्रवादीने लोकसभेचे रणशिंग फुंकले राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात तुतारी. उभाटा, शेकापची जादू चालणार नाही-- राष्ट्रवादी कोलाड  11 मार्च (शरद जाधव)           कोलाड  सारख्या ग्रामीण भागातून एक नेतृत्व तयार होतो आणि दिल्लीचे तख्त गाजवतो हे एका दिवसात उभे राहिलेले नेतृत्व नाही तुमची देखील ताकद मिळाली म्हणून कोलाडच्या मातीतून सुनिल तटकरे सारखे नेतृत्व देशाला लाभले हे तुम्हा सर्वांचे भाग्य असे गौरवोद्गार कृषी मंत्री व स्टार प्रचार प्रमुख धनंजय मुंडे यांनी काढले.           कोलाड येथे नाना नानी पार्क कामाच्या भूमिपूजन व कार्यकर्ता मेळावा प्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे ,मंत्री आदिती ताई तटकरे, आमदार अनिकेत भाई तटकरे,नाना भोड, जि प सदस्य दया पवार,सरपंच सुरेश दादा महाबळे, ज्येष्ठ नेते नारायण धनवी, रामचंद्र चितळकर, तालुका अध्यक्ष प्रितम पाटील, विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव, रामचंद्र चितळकर,नगरसेवक महेंद्र गुजर,मयूर दिवेकर, महेश कोल्हटकर, महेंद्र पोटफोडे,मनोज श
Image
मेढा येथील रायगड भूषण पत्रकार उदय मोरे यांचे दुःखद निधन रोहा- शैलेश गावंड        रोहा तालुक्यामधील मेढा गावातील ज्येष्ठ पत्रकार उदय दत्तात्रय मोरे यांचे ७ मार्च रोजी निधन झाल्याचे समजले सर्वांसाठीच ती एक धक्का दायक बातमी होती पत्रकारितेमधील एक तळपता तारा फार लवकर वयाच्या 56 व्या वर्षी सोडून गेला त्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे उदय माझा पूर्वीपासून मित्र होता १९९३ पासून त्याने पत्रकारितेला सुरुवात केली मी तेव्हा मेढ्यामध्येच राहत होतो आम्ही काही काळ शेजारीच राहत होतो त्याने विविध लेख स्पर्धा कविता स्पर्धेच्या माध्यमातून माझ्यामध्ये लेखनाची गोडी निर्माण केली आणि मला पत्रकारिता या क्षेत्रामध्ये आणले         उदय मोरे यांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्र खूप मोठे होते पत्रकारिता सांभाळून त्याने विविध राजकीय पक्षांमध्ये काम केले तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये पदाधिकारी राहून चांगले कार्य केले पत्रकारितेमध्ये त्यांनी अनेक समस्या यशस्वीरित्या हाताळल्या तसेच त्याने खूप सारे विविध पुरस्कार सुद्धा मिळविले पत्रकारितेमधील एक उमदे खेळकर हसरे व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख होती कॉलेज जीवनात त्याने
Image
  सुदर्शन सुधा सितारा शिष्यवृत्ती वितरण समारंभ  जागतिक महिला दिनी मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते १०२ मुलींना 'सुधा सितारा' शिष्यवृत्ती रोहा प्रतिनिधी          जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सुदर्शन सुधा सितारा शिष्यवृत्ती वितरणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.आर्थिक दुर्बल घटकातील गरजू व हुशार मुलींना दत्तक घेऊन त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज व सुधा सीएसआर फाऊंडेशनचा उपक्रम स्तुत्य आहे," असे गौरवोद्गार राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काढले.       सुदर्शन केमिकल्सच्या वतीने सुधा सीएसआर अंतर्गत जागतिक महिला दिनी अदिती तटकरे यांच्या हस्ते रोहा व महाड तालुक्यातील १०२ मुलींना 'सुधा सितारा' शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली. सुदर्शन कर्मचारी निवासी संकुलातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हास्ययोग तज्ज्ञ व मोटिवेशनल स्पीकर मकरंद टिल्लू, सुदर्शन रोहा साईट हेड विवेक गर्ग, सीएसआर हेड माधुरी सणस, सामाजिक कार्यकर्त्या निधी गर्ग आदी उपस्थित होते.     अदिती तटकरे म्हणाल्या, "गुणवत्तेवर आधारित हा उपक्रम आहे. मुलींमधील ग