Posts

Showing posts from April, 2024
Image
    रोहा तालुक्यातील गोफण येथे कडू परिवाराचे कुलदैवताचे प्राणप्रतिष्ठा  सोहळा उत्साहात साजरा  रोहा प्रतिनिधी      रोहा तालुक्यातील गोफण येथील कडू परिवाराचे कुलदैवताचे प्राणप्रतिष्ठा सोहळा व त्या निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. कडू परिवाराचे कुलदैवताचे प्राणप्रतिष्ठा सोहळा हा दोन दिवस उत्साहात पार पडला.  ह.भ.प.नितीन महाराज मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम करण्यात आले.गुरुवार दिनांक 11 एप्रिल रोजी दुपारी कार्यक्रमाची सुरुवात झाली,होम हवन करण्यात आले.सायंकाळी हरिपाठ,कीर्तन नंतर महाप्रसाद झाले. दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. 12 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता संपूर्ण गावातून कुलदैवताची मिरवणूक व ग्रामदैवेद्यांची भेट करण्यात आली. यात कडू परिवार मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते.सकाळी नऊ वाजता प्राणप्रतिष्ठा, होम व सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. सायंकाळी चार वाजता महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हळदी कुंकू कार्यक्रमासाठी सौ.वरदा सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.ह.भ.प.दिनेश महाराज कडव यांचे नेतृत्वाखाली हरिपाठ झाले.                    आळंदी येथ
Image
रोह्यात राजकीय भूकंप , लाल सलाम ला राम राम करणार  रोहा तालुक्यातील शेकापचे दोन बडे नेते खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार  रोहा : प्रतिनिधी     रायगड लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रोह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून  भातसई विभागातील व मेढा विभागातील शेतकरी कामगार पक्षातील दोन दिग्गज नेते रायगड  लोकसभा निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार  सध्याचे विद्यमान  खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत अशी विश्वसनीय माहिती सूत्रांनी आदिशक्ती ला दिली आहे.लोकसभा २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर शेकापला दिलेला धक्का मानला जात आहे. याचा नक्कीच फायदा हा सुनिल तटकरे यांना होणार असे भाकीत राजकिय बुजुर्ग मंडळी बोलत आहे.           आगामी लोकसभा निवडणुका यांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर रायगड लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते व महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे  यांची नावे जाहीर केली गेली आहेत. प्रचार सभेला सुरुवात होण्यापूर्वीच सुनिल तटकरे यांनी शेतकरी कामगार पक्षांचे नेते जयंत पाटील यांनी तटकरे यांच्या वर केलेल्या जहरी टिकेला उत्तर