रोहा तालुक्यातील गोफण येथे कडू परिवाराचे कुलदैवताचे प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा
रोहा प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील गोफण येथील कडू परिवाराचे कुलदैवताचे प्राणप्रतिष्ठा सोहळा व त्या निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. कडू परिवाराचे कुलदैवताचे प्राणप्रतिष्ठा सोहळा हा दोन दिवस उत्साहात पार पडला. ह.भ.प.नितीन महाराज मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम करण्यात आले.गुरुवार दिनांक 11 एप्रिल रोजी दुपारी कार्यक्रमाची सुरुवात झाली,होम हवन करण्यात आले.सायंकाळी हरिपाठ,कीर्तन नंतर महाप्रसाद झाले. दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. 12 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता संपूर्ण गावातून कुलदैवताची मिरवणूक व ग्रामदैवेद्यांची भेट करण्यात आली. यात कडू परिवार मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते.सकाळी नऊ वाजता प्राणप्रतिष्ठा, होम व सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. सायंकाळी चार वाजता महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हळदी कुंकू कार्यक्रमासाठी सौ.वरदा सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.ह.भ.प.दिनेश महाराज कडव यांचे नेतृत्वाखाली हरिपाठ झाले.
आळंदी येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानेश्वरी ताई काटकर यांचे कीर्तन झाले. महाप्रसाद झाल्यानंतर भजन,जागर करण्यात आले.ह.भ.प.वैभव खांडेकर महाराज व जोत्स्नाताई खांडेकर यांच्या सुमधुर वाणीने जागर करण्यात आले.यात संपूर्ण कडू परिवाराने सहभाग घेतला होता.मोठ्या भक्तीभावाने,उत्साहात, जल्लोषात कडू परिवाराने सहभाग घेतला.ईश्वर कडू यांचे निवासस्थानी संपूर्ण सोहळा पार पडला.
Comments
Post a Comment